आषाढी पायीवारीतील माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविकांना बनकर परिवाराकडून अन्नदान….

वेळापूर (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीतील पायी पालखी सोहळ्यातील भाविकभक्तांना जय मल्हार उद्योग समूह बनकर परिवार यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले.
वेळापूर येथील दत्तात्रय राऊ बनकर व गजराबाई दत्तात्रय बनकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसाय करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. उभय दाम्पत्य यांना उमेश, गोरख व सुनिता बालटे, आटपाडी अशी तीन अपत्य आहेत. उमेश बनकर यांना वेळापूर येथील आडत परिवारातील अरुणा अर्धांगिनी आहेत, तर गोरख बनकर यांना बोरगाव येथील पांढरे परिवारातील उज्वला अर्धांगिनी आहे. उमेश व अरुणा यांना चैतन्य व ऋषिकेश अशी दोन मुले आहेत तर गोरख व उज्वला यांना आशुतोष व आदेश अशी दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या संस्कारावर उमेश व गोरख या दोन राम-लक्ष्मणासारख्या जोडीने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलेले आहे.
चैतन्य उमेश बनकर सिव्हील इंजिनियर झाला आहे तर ऋषिकेश उमेश बनकर एमबीए झालेला आहे. अशितोष गोरख बनकर बीएससी ऍग्री झाला आहे तर आदेश गोरख बनकर मेकॅनिकल इंजिनिअर झालेला आहे. दोघा भावांनी आपली दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन बनकर परिवाराने समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. उमेश व गोरख जशी राम लक्ष्मणासारखी जोडी आहे तशीच त्यांना मिळालेल्या अर्धांगिनी उज्वला व अरुणा यांनी सुद्धा घरामध्ये एकोपा ठेऊन समाजामध्ये चांगला आदर्श दाखवून दिलेला आहे.

जय मल्हार उद्योग समूहाच्या माध्यमातून समाजामध्ये बनकर परिवार नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यात भाविकभक्तांना अन्नदानाचे वाटप करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. बनकर परिवार यांच्या स्तुत्य उपक्रमाचे भाविक भक्तांमधून कौतुक केले जात आहे. समाजामध्ये अनेक धनदांडगे आहेत मात्र, देण्याची दानत लागते, तीच दानत बनकर परिवार यांनी समाजाला दाखवून दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



