मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी यमाई देवीच्या दर्शनास यावे, महाळुंगकरांची व देवी भक्तांची इच्छा आहे
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यमाई देवीचा आशीर्वाद घ्यावा, अशी देवी भक्तांची अपेक्षा आहे…
महाळुंग (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभ येणार आहे, त्यावेळेस माळशिरस तालुक्यात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यमाई देवीचा आशीर्वाद घ्यावा अशी देवी भक्तांची अपेक्षा आहे. ग्रामदैवत असणारे यमाई देवीच्या दर्शनास यावे, अशी महाळुंगकरांची इच्छा आहे.
ग्रामदैवत यमाईदेवी महाळुंग व महाळुंग पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे. सदरच्या मंदिराच्या बारव, तटभिंती, समोरील सभामंडप व इतरत्र पडझड झालेली होती. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी सततचा पाठपुरावा करून गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेला यमाई देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. सध्या मंदिराचे कमान, पायऱ्या व सभामंडपाचे काम पूर्ण झालेले आहेत. बारवचे काम चालू आहे.
पुरातत्व खात्याची अडचण खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांनी दूर केलेली असल्याने उभयतांच्या सपत्नीक उपस्थितीत ग्रामस्थांनी केलेला नवस यमाई देवीला सुवर्ण अलंकार व महा अभिषेक कार्यक्रम महाळुंगकरांनी आयोजित केलेला होता. 40 वर्षांपासून महाळुंगकर व यमाई देवी भक्त जीर्णोद्धाराची वाट पाहत होते. असा प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेला असल्याने यमाईदेवी रणजीतदादा व बबनदादा यांच्या पाठीशी आशीर्वाद रुपी उभी राहिलेली आहे. माढा लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक होते. अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून अनेकांनी प्रयत्न केले.
परंतु, यमाई देवीचा आशीर्वाद आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय निवड समिती यांना खऱ्या अर्थाने शिफारस करणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाविजय संयोजक श्रीकांतजी भारतीय यांच्यासह महाराष्ट्रातील निवड समिती यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी देऊन माढा लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ माळशिरस तालुक्यातून होत आहे. प्रथमच माळशिरस तालुक्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत असल्याने प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामदैवत यमाईदेवीच्या दर्शनास यावे आणि विजयाचाच आशीर्वाद घ्यावा, अशी महाळुंगकरांची व देवीभक्तांची इच्छा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.