“तुतारी” वाजवायला कोळवी, निळवी, चिळवी, मापटं, शेर सर्वांनी एकत्र या, अशा साहेबांच्या आदेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू….

मुंबई (बारामती झटका)
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह नव्याने घेतलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत.
काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व इतर पक्षांची व संघटनांची महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडे लोकसभेच्या जागा आहेत. त्यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावे घोषित केलेले आहेत. उर्वरित लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेकजण धडपड करीत आहेत.
दिल्ली, मुंबई, पुणे, बारामती या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांना इच्छुक भेटण्यासाठी जाऊन उमेदवारी मागत आहेत. अनेकांना पवार साहेबांची तुतारी वाजवायला सोपी वाटत आहे. मात्र, अनेक राजकीय नेते व कार्यकर्त्यांचा समज पवार साहेबांनी दूर केलेला आहे.
तुतारी चिन्ह घेऊन उभारायचे असेल किंवा तुतारी वाजवायची असेल तर घरातील कोळवी, निळवी, चिळवी, मापटं, शेर सर्वांनी एकत्र या, असा साहेबांचा आदेश तुतारी चिन्ह मागणाऱ्यांना केलेला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.