“मुन्नी बदनाम”, तसंच माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी “तुतारी” बदनाम केली
घार फिरते उंच आकाशी तिथे चिमण्या, कावळ्यांचं काय काम ? तसंच संसदेमध्ये गुन्हेगार असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचं काय काम मतदारांचा सवाल…
माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 34 गुन्हे नोंद आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशांमध्ये चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदार संघ आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर महायुतीकडून अधिकृत उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूकीत उभे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर विविध ३४ गुन्हे नोंद आहेत. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेतलेली असल्याने समाजामध्ये महान आहे, मोकळ्यात मुन्नी बदनाम झाली. तसाच प्रकार माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी बदनाम केली, अशी माढा लोकसभा मतदारसंघातील मतदार व सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.
तुतारी म्हणजेच शिंगाडा आहे. अनादी काळापासून तुतारीला महत्व आहे. मंगलमय व पवित्र, धार्मिक कार्यक्रमाला तुतारी वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढविली जाते. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात तुतारी असल्याने तुतारी बदनाम झालेली आहे. घर फिरते उंच आकाशी तिथे चिमण्या कावळ्यांचे काय काम ?, तसंच संसदेमध्ये जनहिताचे व राष्ट्रहिताचे निर्णय घेणारे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याशिवाय गुन्हेगार असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचे संसदेमध्ये काय काम, असा सवाल मतदारांमधून होत आहे.
तुतारीचा उमेदवार, अट्टल गुन्हेगार..!!!
एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या ठेवी बुडवणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकवणे, फिर्यादीला धमकावून त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवणे यासह गोरगरीब जनतेवर अनन्वित अत्याचार करणे यासारखे तब्बल ३४ गुन्हे दाखल असलेला उमेदवार आहे. तर दुसरीकडे विकासाची व्याख्या बदलणारा जलनायक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा रणजितदादा आहे. मतदारांना गुलामाची वागणूक देणाऱ्यांना कायमस्वरूपी घरी बसवून प्रगतीचा, संघर्षाचा आणि विकासाचा वारसा सांगणाऱ्या हिंदुरावांच्या हिंदुत्ववादी रणजितदादाला आपला खासदार करायचं हे जनतेने आता ठरवलं आहे…!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.