नगरसेवक महेश शिंदे यांच्याकडून लहान मुलाला शासकीय योजनेचा लाभ

अकलूज (बारामती झटका)
अकलूज, ता. माळशिरस येथील प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक महेश शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एका लहान मुलाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत संवेदनशील कार्य केले.
मदारीबाई यांनी नगरसेवक महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलाला नुकताच मुलगा झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यक कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता. या अनुषंगाने हॉस्पिटल येथे जाऊन कागदपत्राची पूर्तता करून संबंधित कुटुंबाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळवून दिला.
संबंधित कुटुंबाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात येताच नगरसेवक महेश शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करून घेतली. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे, शिंदे यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून मोबाईलद्वारे आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे उपचाराचा मार्ग मिळाला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी नगरसेवकांच्या तत्परतेचे कौतुक केले. “गरजू कुटुंबांना मदत करणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे ” समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत नगरसेवक महेश शिंदे यांनी व्यक्त केले. या सामाजिक कार्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



