नागरिकांनी आरोग्य विषयक सहकारी योजनेचा लाभ घ्यावा – ॲड. एम. एम. मगर

माळशिरस (बारामती झटका)
“आरोग्य चांगले तर सर्व चांगले” यासाठी प्रत्येक नागरिकांनी आरोगविषयी जागरुक राहिले पाहिजे. आरोग्याबाबत सहकारी योजनांचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे हे प्रत्येकांचे प्रथम कर्तव्य. शासनाने प्रत्येक नागरिकांसाठी रुपये ५ लाख पर्यंत मोफत उपचाराची सोय केलेली आहे, त्याचा लाभ घेतल्यास आरोग्याबाबतचा आजच्या काळात होणारा अवाढव्य खर्च आटोक्यात येवु शकतो.

माळशिरसचे साखर कारखान्याचे माजी लेबर ऑफिसर रामभाऊ मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक ॲड. एम. एम. मगर बोलत होते. त्यावेळी उपस्थितांनी आरोग्य विषयक प्रत्येकांने जागरुक राहावे, एकमेकांना मार्गदर्शन करावे अशा पध्दतीने चर्चा झाली.
या कार्यक्रमास श्री. गंगाधर पिसे, श्री. निवृत्ती करे, डाॅ. पंचवाघ, श्री. वामन वाघमोडे, श्री. सुधीर ढवळे, श्री. अजित तरडे, श्री. विजय खराडे, श्री. क्षिरसागर आण्णा इत्यादी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.