जिजाऊ मातेने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, त्याच पद्धतीने प्रत्येक महिलेने आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यावे – ज्योतीताई शिंदे, शिवसेना नेत्या
करमाळा (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे यश मिळवले त्या यशाचा पाया रचण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी सातत्याने स्वाभिमानांचे संस्कार छत्रपती शिवाजीराजांच्या मनात रुजवले. आईचे संस्कार मजबूत झाल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जनतेचे रयतेचे राज्य निर्माण करू शकले. यामुळे प्रत्येक महिलांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून संस्कार करावे, असे आवाहन सोलापूर शिवसेनेच्या नेत्या ज्योतीताई शिंदे यांनी केले.
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिवसेना कार्यालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शिलवंत, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक दीपक पाटणे, शेअर समन्वयक शिवकुमार चिवटे, गुरुराज चिवटे, शाखाप्रमुख नागेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील जवळपास 300 महिलांना बांधकाम कामगार नोंदणी करून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दिलेल्या योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचा नेत्या ज्योतीताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यापुढील काळात सोलापूर जिल्ह्यातील किमान दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ देणार असून रोजंदारीने काम करणाऱ्या महिला, शेतमजूर, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, घरेलू कामगार, भांडी करणाऱ्या महिला सर्व संघटित महिलांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ज्योतीताई शिंदे यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng