Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

नातेपुते शिक्षण संस्थेवर भुजंगाचे साम्राज्य उध्वस्त करण्याकरता हालचाली वाढल्या…

शिक्षण आयुक्त सचिनद्र प्रताप सिंह यांच्याकडे पदभार आल्याने प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांची पीडित महिला व संबंधित नातेवाईक भेट घेणार….

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांनी शिक्षण संस्था, साखर कारखाने, दूध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून राजकारण केलेले आहे. नातेपुते येथील सुप्रसिद्ध व जुन्या शिक्षण संस्थेत नोकर भरतीवेळी राजकीय हेतू ठेवून नोकरी दिली जात असत. नोकर भरतीच्या वेळी भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे बडा राजकीय नेता चौकशीच्या भवऱ्यात अडकून अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरू आहे, अशी बातमी बारामती झटका वेब पोर्टल यांनी प्रसारित केल्यानंतर अनेक पीडितांनी संपर्क साधलेला आहे. बारामती झटका यांच्याकडे उपलब्ध झालेल्या कागदपत्रामध्ये पाहिल्यानंतर धक्कादायक प्रकार नातेपुते येथील शिक्षण संस्थेच्या नोकर भरतीत आईचा घो झाल्याचा प्रकार शिक्षण आयुक्त यांना शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या सुनावणीत पाहिल्यानंतर पुन्हा सुनावणी व इतिवृत्तांत उकरणे गरजेचे असल्याचे संबंधित नातेवाईक यांच्याकडून बोलले जात आहे. अशी बातमी प्रसारित करताच संबंधित नातेपुते शिक्षण संस्थेवर भुजंगाचे साम्राज्य उध्वस्त करण्याकरता हालचाली वाढलेल्या आहेत. शिक्षण आयुक्त सचिनद्र प्रताप सिंह यांच्याकडे नवीन वर्षात आयुक्त पदाचा पदभार आलेला आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकारी असल्याने संबंधित शिक्षण संस्थेतील पीडित महिला व संबंधित नातेवाईक भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा नातेपुते पंचक्रोशीत सुरू आहे. खास प्रतिनिधी त्यांच्याकडून हाती आलेल्या वृत्तानुसार सदरच्या शिक्षण संस्थेवर भुजंगाचे साम्राज्य असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. महायुतीकडे अनेक सर्पमित्र आहेत. कसलाही भुजंग असला तरी सर्पमित्र पकडून देवा भाऊ यांच्या हवाली करतील व सदरचा भुजंग गारुड्याच्या ताब्यात द्यायचा ?, का जंगलामध्ये सोडून द्यायचा ?, याचा विचार करतील, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

गोपनीय माहितीनुसार, सदरच्या शिक्षण संस्थेत दोन कोटी सत्तर लाखाचा गैरव्यवहाराचा आकडा सोशल मीडियावर गावठी चाणक्य याद्वारे सोशल मीडियावर पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे चौकशीच्या अगदी शेवटच्या अंतिम टोकावर नातेपुते शिक्षण संस्था आलेली आहे. लवकरच कार्यवाही सुरू झाल्यानंतर नावानिशी बातमी प्रसारित केली जाईल.

पाठीमागील बातमीमध्ये पीडित शिक्षिका यांच्याकडून प्राप्त झालेली कागदपत्रे त्यामध्ये जाहिरात, नियुक्तीपत्र, शिक्षण सेवक प्रस्ताव, त्रुटी पत्र, रुजू अहवाल, सहशिक्षिका प्रस्ताव, मान्यतेस विलंब झाल्याने याचिका, उच्च न्यायालयाचा निकाल, उपसंचालक यांना विनंती अर्ज, शाळा चौकशी अहवाल जिल्हा परिषद सोलापूर, उपसंचालक यांचा निर्णय, सुधारित आदेश मिळणेबाबत पत्र, आयुक्तांना निवेदन अशा २७ पानांचा पत्रव्यवहार झालेला आहे.

शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयात सुनावणी इतिवृत्तांत औदुंबर उकिरडे यांनी आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केलेल्या मध्ये, विषय, शाळेचे नाव, त्यामधील तत्कालीन पीडित यांच्या स्वाक्षरीच्या बनावट आणि शिक्षण विभागात सोलापूरमध्ये नोंद नसलेल्या प्रशालेतील सर्व शिक्षक आणि तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्था जनरल सेक्रेटरी यांच्यावर शिक्षण विभागाची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 67, 68, 71, 406, 409 आणि 420 अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणेबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर यांना आदेश होणे बाबत या विषयावर सुनावणी झाली. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक श्री. औदुंबर उकिरडे, शिक्षण उपनिरीक्षक श्री. धनाजी बुटे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा सोलापूर यांचे कार्यालयातील कक्ष अधिकारी श्री. अजित देशमुख यांच्यासह शाळा व संस्था प्रतिनिधी यांचे सुप्रसिद्ध वकील, तत्कालीन संस्था सेक्रेटरी, माजी मुख्याध्यापक, सहशिक्षिका व सहशिक्षक सहा जण, पूर्णवेळ ग्रंथपाल अशा 15 लोकांच्या उपस्थितीत सुनावणी झालेली होती.

सदरच्या सुनावणीचा अहवाल बारामती झटका यांना प्राप्त झालेला आहे. सुनावणी इतिवृत्तांत निर्णय पाहिल्यानंतर दुबारा सुनावणी झाल्यास खऱ्या अर्थाने दूध का दूध, पाणी का पाणी होईल. नातेपुते येथील नोकर भरतीच्या आईचा घो… झाल्याचा प्रकार लवकरच समोर येईल. यासाठी पिढीतांनी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा, असे पीडित व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येत आहे, असे आवाहन केलेले होते. पीडित शिक्षिका यांचे नातेवाईक यांनी धक्कादायक माहिती सांगितलेली आहे, ती माहिती बातमीमध्ये प्रसारित करता ही येत नाही, अशी माहिती सांगितलेली आहे. लवकरच सर्वच प्रकारच्या गोष्टींचा कागदोपत्री अहवाल सादर झाल्यानंतर सर्वच गोष्टी वाचकांना दिल्या जातील. अजून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. पीडितांनी बारामती झटका त्यांच्याशी संपर्क साधावा असे आपणांस पुन्हा आवाहन करण्यात येत आहे.

उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची बदली झालेली आहे. त्यानंतर दोन उपसंचालक येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सदरच्या प्रकरणाकडे गांभीर्याने शिक्षण आयुक्त यांना पीडित व नातेवाईक भेटणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom