नवरा नवरी पोहोचले विजयदादांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यासाठी
अकलूज (बारामती झटका)
आज अकलूज, ता. माळशिरस येथे तरंगफळ येथील सुग्रीव गंगाराम तरंगे यांचे चिरंजीव सुजित व गोरडवाडी येथील धुळाबाजी गोरड यांची कन्या पुनम यांचा शुभविवाह अन्नपूर्णा मंगल कार्यालय, अकलूज या ठिकाणी पार पडला. त्यानंतर महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब यांचा वाढदिवस असल्याकारणाने अनेक वऱ्हाडी मंडळी, ग्रामस्थ, पाहुणेमंडळी हेही लग्न लागल्यानंतर विजयदादांना शुभेच्छा देण्यासाठी जात होते.
त्यानंतर नवदाम्पत्यांनी दादांना शुभेच्छा देण्यासाठी स्मृती भवन गाठले व आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विजयदादांनीही त्यां दोघांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख मारुती जानकर, तरंगफळचे माजी सरपंच महादेव उत्तमराव तरंगे यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले अनेक मान्यवर नेते, ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I appreciate the humor in your analysis! For additional info, visit: FIND OUT MORE. What do you think?
I enjoyed reading this article. Its thought-provoking and well-presented. Lets discuss this further. Click on my nickname!