निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ वाढवून मिळाला…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दि. १८/१०/२०२३ ते दि. २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ची होती. ही वेळ आता वाढवून ५.३० पर्यंत करण्यात आली आहे. तसे आदेशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना अर्ज भरता आले नाही त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ३/१०/२०२३ रोजी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दि. १६/१०/२०२३ ते दि.२०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार दि. १६/१०/२०२३ पासून संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशनासोबत सादर करायचे घोषणापत्र संगणक प्रणाली द्वारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण महा ऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. त्यामुळे दि. १८/१०/२०२३ ते दि. २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असून ती वेळ आता वाढवून ५.३० पर्यंत करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
What a great read! The humor was a nice touch. For further details, click here: READ MORE. Let’s chat about it!