ताज्या बातम्याराजकारण

पैलवान विशाल घोरपडे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल उपाध्यक्षपदी नियुक्ती…

माजी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले…

इंदापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते वैदूवाडी गावचे थोर सुपुत्र पैलवान श्री. विशाल चंद्रकांत घोरपडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल अध्यक्ष श्री. दशरथ साहेबराव पवार यांनी उपाध्यक्ष पदावर निवड करून सदर निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रेमी उपस्थित होते.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल अध्यक्ष श्री. दशरथ साहेबराव पवार यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यात धुमधडाक्यात काम सुरू आहे. श्री. विशाल चंद्रकांत घोरपडे रा. वैदूवाडी, पो. लासुर्णे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सदर पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनील तटकरे, सहकार मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री कार्यक्षम आमदार दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, आचारविचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी व जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवून जास्तीत जास्त समाज विधायक कामे करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, असा मला विश्वास आहे. असे पत्र तालुका अध्यक्ष श्री. दशरथ पवार यांनी नियुक्तीचे पत्र दिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

  1. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button