ताज्या बातम्यासामाजिक

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची राहुल मदने यांच्या आर.एम. ऑरगॅनिक्स कार्यालयाला सदिच्छा भेट….

पिलीव (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उद्योजक राहुल मदने यांच्या पिलीव येथील आर्यन ऑरगॅनिक्स कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरदबापू मोरे, राहुल मदने, प्रतिभा मदने, संतोष शेंडगे, योगेश शेंडगे, पूनम भैस, स्वप्नील सावळजकर, नरेंद्र बनसोडे, अण्णा बुधावले, संतोष सदिवाले, बाळासाहेब जानकर, संकेत देशमुख, गणेश देशमुख, नारायण करांडे, साजिद शेख, यश उरवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे महिलांनी औक्षण केले. तर युवा नेते राहुल मदने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पिलीव सारख्या ग्रामीण भागामध्ये उद्योजक राहुल मदने यांनी आर. एम. ऑरगॅनिक्स कंपनी उभा करून सदरच्या कंपनीमध्ये चिले टेड मायक्रो nutrients, आयातीत NPK खते, बोरॉन कॅल्शियम, झिंक combi, अमृत संजीवनी ऊस पिकासाठी, ऑक्सिस्टार अशी प्रॉडक्ट तयार होत असतात. परिसरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. अशा R.M.Organics कंपनीच्या ऑफिसला सदिच्छा भेट देण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button