समस्त पत्रकारांच्या वतीने घातक स्फोटक केमिकल तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर यांना निवेदन

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरामणी बीट अंतर्गत घातक, स्फोटक केमिकल तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सिद्धाराम नंदरगी जिल्हा प्रतिनिधी, जनसंसद न्यूज, समस्त पत्रकार, जिल्हा प्रतिनिधी (दैनिक, साप्ताहिक, न्यूज चॅनल) यांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बोरामणी बीट अंतर्गत घातक, स्फोटक केमिकल तस्करी करणाऱ्या सुहास कांबळे व त्याच्या साथीदारांवर त्वरित कारवाई करून सदर बेकायदेशीर धंदा कायमचा बंद करण्यात यावा. त्याचबरोबर स्फोटक गॅस व इतर बेकायदेशीर व्यवसाय आपण स्वतः पाहणी, पडताळणी करून कायमचे बंद करावेत.


सुहास कांबळे हा गुंड प्रवृत्तीचा व राजकीय पुढार्यांचा हस्तक असून हा मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळे दोन नंबर धंदे करत असल्याचे समजते आहे. बोरामणी बीट हद्दीत एका धाब्यावर केमिकल तस्करी करत असल्याचे आम्हाला माहिती मिळताच आम्ही बातमी करण्यासाठी पाहणी, पडताळणी व चित्रीकरण करण्यासाठी त्या ठिकाणावर गेल्यावर तेथील काही गुंड व सुहास कांबळे नामक तस्कर, मोबाईल, कॅमेरे फोडून टाकेन, खंडणी दाखल करीन, गाडीखाली घालून तुडविन, माझा नाद करायचा नाही याच बरोबर अश्लील शिवीगाळ केली. तसेच मी राहत असलेल्या घर परिसरात रविवारी रात्री गुंडांना घेऊन येऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तशी रीतसर फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे नोंद आहे.

सर्व बातमी करणाऱ्या पत्रकारांना तो असेच वैयक्तिक टारगेट करून अर्वाच्य भाषा, दमदाटी व हाणामारी करतो. तरी याचे मागील गुन्हे रेकॉर्ड तपासून कायमचा बंदोबस्त करून आम्हा पत्रकारांना संरक्षण द्यावे, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर सिद्धाराम नंदरगी, श्रीनिवास बनसोडे, महेंद्र शिरसट, दीपक जाधव, लतीफ नदाफ, असलम नदाफ, आबा भंडारे, ऋषिकेश ढेरे, मिलिंद साठे, नितीन कांबळे, एम. एम. जाधव, बापू पाटील, आप्पासाहेब लंबाटे, कुमार सोनवणे, बाशाभाई शेख आदींच्या सह्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.