पाण्याचा साठा आरक्षित ठेवा, फोंडशिरसच्या माजी उपसरपंचांचे उपअभियंत्यांना पत्र…

फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस येथील माजी उपसरपंच उमाजी बोडरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उपअभियंता कार्यालयाला पत्र दिले आहे. मौजे फोंडशिरस येथील इरिगेशन तलावातील पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने नीरा उजवा कालवा उपविभागीय अभियंता कार्यालयामध्ये पत्र दिले आहे. सदरचे पत्र श्री. कदम यांनी स्वीकारले आहे.
सदरच्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, मौजे फोंडशिरस येथेइरिगेशन तलाव असून सदर तलावामधून मौजे फोंडशिरस गावाचा संपूर्ण पाणीपुरवठा अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने तलावाची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी तलावातील पिण्याच्या पाण्याचा पुरेल एवढा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.