परभणी येथील समाजद्रोहींवर कठोर कारवाई करावी, श्रीपूर आरपीआय शहर शाखेची मागणी
श्रीपूर (बारामती झटका)
परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच या घटनेचा मुख्य सुत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे याबाबतचे निवेदन आज श्रीपूर शहर आरपीआय आठवले गट यांच्यावतीने स्थानिक पोलीस प्रशासन यांना देण्यात आले. तसेच सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी श्रीपूर शहर आरपीआय आठवले गट अध्यक्ष गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख भारत आठवले, माळशिरस तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके, ज्येष्ठ पत्रकार बी. टी. शिवशरण, जिल्हा युवा उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे, तालुका युवा उपाध्यक्ष बाबूराव भोसले, रमेश भोसले, संजय खरे, सचिन ताकतोडे, महेश रणपिसे, राज आठवले, तेजस बाबर, सागर आठवले, प्रथमेश लोंढे, अमोल बनसोडे, रशिद मुलाणी, गुडम भालशंकर, विजय भोसले, गौतम आठवले, राजू शेंडगे, माधव साठे सर, नागनाथ वाघमारे सर, अनिल दळवी, बापू सावंत, सुरेश लोखंडे, प्रकाश साठे, संतोष भोसले, महावीर आंबोडकर, अनिल कांबळे, बापू खरात, आदित्य पक्षाळे, समाधान आल्हाट, दावल लोंढे, दिपक भोसले इत्यादी उपस्थित होते.
यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख भारत आठवले, बापू पोळके, माधव साठे सर यांनी परभणी येथील घटनेचा निषेध आपल्या भाषणातून व्यक्त केला. श्रीपूर पोलिस औट पोस्टचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब पानसरे यांनी निवेदन स्वीकारले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.