ताज्या बातम्यासामाजिक

पत्रकारास धक्काबुक्की करणे पडले महागात…

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल

बार्शी (बारामती झटका)

जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत हिंदवी समाचार चे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर बार्शी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना त्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्या विरोधात भादवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. Hello,

    I just wanted to know if you require a better solution to manage SEO, SMO, SMM, PPC Campaigns, keyword research, Reporting etc. We are a leading Digital Marketing Agency, offering marketing solutions at affordable prices.

    We can manage all as we have a 150+ expert team of professionals and help you save a hefty amount on hiring resources.

    Interested? Do write back to me, I’d love to chat.

    If you are interested, then we can send you our past work details, client testimonials, price list and an affordable quotation with the best offer.

    Many thanks,
    Bemi Brooks

    Wishing you a fantastic New Year filled with achievements and growth!

    Your website : baramatizatka.com

  2. Earn up to $60,000 USD as a 4U2 Inc. Independent Contractor Agent! We’re seeking individuals worldwide with computer access, fluent English communication skills, and a desire to save time and money for suppliers, buyers, and salespersons in our E-Commerce Marketplace. Join our mission to “Save Suppliers, Buyers, and Salespersons Time, Money, and make Money!” Contact us at [email protected] for more info..

  3. This was a fantastic read! The author did an excellent job presenting the information in an engaging way. I’m eager to hear different viewpoints on this. Check out my profile for more discussions.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button