पिलीव व परिसरात श्रीराम नवमी चा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील पिलीव, बचेरी, कोळेगाव व परिसरात श्रीराम नवमीच्या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थ व श्रीराम भक्तांनी केले होते. त्याप्रमाणे सर्व ठिकाणी “श्रीराम जय राम जय जय राम” या जयघोषामध्ये अतिशय उत्साही व भक्तीमय वातावरणामध्ये श्रीराम नवमीचा उत्सव साजरा करण्यात आल्याचे समजते.
पिलीव येथील श्रीराम मंदिरामध्ये बाल कीर्तनकार ह. भ. प. वेदांत देशपांडे (इ. आठवी) यांनी आपल्या बोलक्या वाणीतून सर्व सिद्धांतासहित श्रीराम कथेचे कथन करून श्रोते वर्गाला मंत्रमुग्ध केले. या ठिकाणी आरतीचा सन्मान श्री. व सौ. ॲड. आसावरी घाटे व अजय घाटे यांना मिळाला. या ठिकाणी मंदिराच्या बाहेरही बहु गर्दी श्रीराम भक्तांनी केली होती.
श्रीराम गणेश मित्र मंडळ व श्रीराम भक्तांनी या ठिकाणी परिश्रम घेतले. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही “श्रीराम नवमी” साजरी करण्यात आली. तर श्रीमहालक्ष्मीनगर, भैस वस्ती या ठिकाणीही “श्रीरामनवमीचा” उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी ह. भ. प. टेळे महाराज व एका महिला कीर्तनकारांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने श्रीराम भक्तांना श्रीराम कथेचे कथन केले. त्याचप्रमाणे सुळेवाडी येथे हरिहर गडामध्ये गुरुभक्ती भूषण ह. भ. प. हरिहरनंदन उर्फ रवींद्र करमाळकर महाराज यांनीही आपल्या अमृतवाणीतून अतिशय मार्मिकपणे आपल्या कीर्तनातून श्रीराम कथेची माहिती श्रीराम भक्तांना दिली. आणि बचेरी या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये ह. भ. प. राहुल महाराज मोरे यांनी उपस्थित श्रीराम भक्तांना उपदेशपर अनेक उदाहरणातून आपल्या देशाची संस्कृती जपण्याचा मौल्यवान सल्ला दिला. त्याप्रमाणेच कोळेगाव या ठिकाणीही “श्रीराम नवमी” निमित्त ठेवण्यात आलेल्या कीर्तनातून ह. भ. प. संजय सरोदे महाराज यांनी श्रीरामभक्तांना श्रीराम कथेतून सुसंस्कारित मूल्यांची माहिती दिली.
अशाप्रकारे सर्व ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये “श्रीराम नवमी” चा उत्सव साजरा करण्यात आला. व प्रसादाचा अलभ्य लाभ श्रीरामभक्तांनी घेतला. वरील सर्व ठिकाणी “श्रीराम नवमीच्या” निमित्ताने भक्तिमय वातावरण दिसून आले व भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरती उत्साह जाणवला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I enjoyed reading this article. Its thought-provoking and well-presented. Lets discuss this further. Click on my nickname!