पिलीव येथे विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न
कोळेगाव (बारामती झटका) सतिश पारसे यांजकडून
पिलीव ता. माळशिरस येथे विविध विकासकामांचे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, माजी जि. प. सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या हस्ते करण्यात आले.
पिलीव ग्रामपंचायतीने नव्याने बांधलेल्या महात्मा फुले शॉपिंग सेंटर नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा, मुख्य पेठेतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, मच्छी मार्केटच्या दोन गाळ्यांचे उद्घाटन व संत सावता माळी सभा मंडपाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून माळशिरस तालुक्याला भरपूर निधी मिळाला असून त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यामधून गेलेल्या दोन पालखी महामार्गासाठी जवळजवळ एक हजार कोटी निधी मिळाला आहे. राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळत असून ऊर्जा विभागासाठी महावितरणसाठी राबविल्या जाणाऱ्या आरडीएसएस योजनेची माहिती दिली.
यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये पिलीव गावातील महालक्ष्मी यात्रा मोठ्या संख्येने भरली जाते. यात्रा काळात भाविकभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी महालक्ष्मी मंदिरासाठी भक्तनिवास बांधणे, सुसज्ज रस्ते, वीज, पाणीपुरवठा व इतर सुविधा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच पिलीव येथील सुसज्ज शासकीय विश्रामगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार म्हणाले की, पिलीव गावासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी ग्रामपंचायतीने मागणी केलेल्या प्रत्येक कामासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. सरपंच नितीन मोहिते यांची सरपंच पदाची कारकिर्द उल्लेखनीय आहे. शॉपिंग सेंटरच्या खालच्या इमारतीतील गाळे हे जुन्या भाडेकरूंनाच देण्यात आले असून वरच्या मजल्यावरील गाळे हे प्रामुख्याने गावातील होतकरू व गरजू तरुणांना दिले आहेत.
या कार्यक्रमास आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटिल, सरपंच नितिन मोहिते, उपसरपंच सोनाली करमाळकर, अविनाश जेऊरकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सचिन पाटील, दादासाहेब शिंगाडे, पिलीवचे ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. बाबर तसेच पिलीव परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रघुनाथ देवकर यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Excellent content! The way you explained the topic is impressive. For further details, I recommend this link: EXPLORE FURTHER. What do you all think?