मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या भाजप पक्ष वाढीचे कौतुक केले.

रामभाऊ तुम्ही ताकतीने लढा मी आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीमागे ठाम आहे…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या भाजप पक्ष वाढीचे कौतुक करून रामभाऊ माळशिरस तालुक्यामध्ये तुमचा संघर्ष सुरू आहे तो असाच संघर्ष चालू राहू द्या. तुम्ही ताकतीने लढा मी आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठाम आहे.
रामभाऊ विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मतदान घेतलेले आहे. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान सुरू करून वाड्यावर, गावागावात गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान राबवलेले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी हजार सभासद केलेले आहेत. लवकरच जास्तीत जास्त सभासद करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समवेत वैचारिक बैठक घेतली जाईल. विधानसभेमध्ये आपण पोटतिडकीने निरा-देवधर चा प्रश्न मांडलेला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांची तळमळ व पिढ्यानपिढ्या जाणीवपूर्वक प्रस्थापितांनी वंचित ठेवलेल्या निरा-देवधर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. लवकरच माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना निरा-देवधरचे हक्काचे पाणी मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माळशिरस तालुक्यातील प्रलंबित प्रश्न व विकास कामांसाठी मदत व सहकार्य राहणार आहे. जय पराजयाची तमा न बाळगता सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी आपला संघर्ष सुरू आहे, असाच संघर्ष पुढे ठेवण्याकरता निश्चितपणे आपल्या संघर्षाचा विचार केला जाईल असे सूचक वाक्य बोलून खंबीरपणे पाठीमागे उभा राहणार असल्याचे आश्वासित केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.