दसुर येथे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, मठाचा सातवा वर्धापन संपन्न होणार

दसुर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस आणि स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापित श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मठाचा सातवा वर्धापन दिन रविवार दि. १९ जुलै २०२६ रोजी दसुर, ता. माळशिरस येथे होत आहे. स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती कांचन हनुमंत डोळस आणि खजिनदार युवा नेते चिरंजीव संकल्पदादा हनुमंत डोळस यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ६ ते ८ श्रींना अभिषेक व पुजा, दुपारी १२ वाजता महाआरती, सकाळी ११.०० वाजता पालखी, मिरवणुक, दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद अशी असणार आहे.

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी या मठाची स्थापना केली होती. दसुर परिसरात श्री स्वामी समर्थांचे मंदिर नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्त दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

तरी दसुर परिसरातील सर्व भाविकभक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, मठाच्या सातव्या वर्धापन दिनास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



