ताज्या बातम्या

प्रभू श्रीरामचंद्र यांनी 14 वर्ष वनवास भोगला मात्र महाळुंगचे ग्रामदैवत श्री यमाई देवीला 42 वर्ष जीर्णोद्धाराचा वनवास भोगावा लागला..

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे या दोघांच्या उभयपत्नी समवेत प्रलंबित जीर्णोद्धाराचा व इतर समाज उपयोगी कार्यक्रमाचे जंगी आयोजन.

महाळुंग (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात भाविकांचे श्रद्धास्थान असणारे महाळुंग गावचे ग्रामदैवत यमाई देवी मंदिराचा प्रलंबित जीर्णोद्धार व इतर समाज उपयोगी कार्यक्रमाचे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा विठ्ठलराव शिंदे व उत्कृष्ट गृहिणी सौ. सुनंदाताई बबनराव शिंदे उभयतांच्या शुभ हस्ते 42 वर्षापासून यमाई देवी मंदिराच्या प्रलंबित जीर्णोद्धाराचा कार्यक्रम करून उभयतांच्या शुभहस्ते महापूजेचे आयोजन केलेले आहे. यमाई देवीच्या प्रलंबित जीर्णोद्धार व्हावा यासाठी महाळुंग गावचे ज्येष्ठ नेते व महाळुंग नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रावसाहेब चांगदेव सावंत पाटील यांच्याकडून यमाई मातेच्या चरणी सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात येणार आहेत व भारत सरकारच्या ग्राहक व्यापारी विभागाच्या वतीने साठ रुपये किलो दराने नागरिकांसाठी हरभरा डाळ विक्री योजनेचा शुभारंभ सोमवार दि. 16/10/2023 रोजी सकाळी 10 वाजता यमाई देवी मंदिर, महाळुंग, ता. माळशिरस येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकभक्तांनी उपस्थित रहावे, असे महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण, महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक राहुल आप्पा रेडे पाटील, महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना रावसाहेब सावंत पाटील, नगरसेवक श्री. नामदेव हरिबा इंगळे, नगरसेविका सौ. तेजश्री विक्रमसिंह लाटे, नगरसेविका सौ. शारदा नामदेव पाटील, नगरसेविका सौ. सविता शिवाजीराव रेडे पाटील यांच्यावतीने व समस्त ग्रामस्थ महाळुंग यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

महाळुंग गावचे जागृत व स्वयंभू यमाई देवीचे मंदिर आहे. सदरचे मंदिर पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आहे. मंदिराची पडझड झालेली होती‌ जिर्णोद्धार व मंदिर परिसर विकास करणे गरजेचे होते. यासाठी माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. तिसरी टर्म आहे. माळशिरस तालुक्यातील 14 गावे माढा विधानसभा मतदारसंघात जोडलेली आहेत‌. त्यामध्ये महाळुंग गावचा ही समावेश आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचं यमाईदेवीचा जीर्णोद्धार व विकास होऊन मंदिर परिसर स्वच्छ व्हावा यासाठी मनापासून धडपड व प्रयत्न सुरू होता. मात्र, पुरातत्व खात्याची अडचण येत होती. यासाठी केंद्रात हक्काचा माढा मतदार संघाचा खासदार असल्याशिवाय सदरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार नव्हते. यासाठी भाजपचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचेही प्रयत्न सुरू होते. जरी रणजीतसिंह नाईक निंबाळकर भाजपचे खासदार व बबनदादा शिंदे राष्ट्रवादीचे आमदार असले तरीसुद्धा यमाई देवीच्या जीर्णोद्धारावर दोघांचेही सातत्याने प्रयत्न सुरू होते. खऱ्या अर्थाने रणजीतसिंह नाईक निंबाळकर उर्फ रणजीतदादा यांची मोलाची साथ मिळालेली आहे. अनेक दादा आले आणि गेले मात्र, जीर्णोद्धाराचा प्रश्न सोडविण्यामध्ये रणजीतदादा व बबनदादा यशस्वी “दादा” ठरलेले आहेत. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये यमाई देवीस भाविकांची गर्दी राहते. जिर्णोद्धार होणार असल्याने यमाई देवी भाविकभक्तांमध्ये दोन दादांच्या कामगिरीविषयी समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

  1. This is top-notch! I wonder how much effort and time you have spent to come up with these informative posts. Should you be interested in generating more ideas about Outsourcing, take a look at my website QN9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button