ताज्या बातम्या

प्रमोद शिंदे यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नातेपुते (बारामती झटका)

दि. 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त पिरळे ता. माळशिरस येथील नातेपुते व परिसरात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून देत असणारे तसेच झाडे लावा झाडे जगवा च्या माध्यमातून दीड लाख वृक्षारोपण करून, बेटी पढावो बेटी बचावो, जल शक्ती यासारखे अभियान राबवणारे, गरजू, गरीब विद्यार्थी तसेच अनेक लोकांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्रात राबवणारे पत्रकार प्रमोद शिंदे यांना साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे शासनमान्य आधार प्रतिष्ठान मुंबई, ठाणे यांच्यावतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे शासनमान्य आधार प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. त्याचप्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी २०२४ रोजी सायं. ४ वाजता, टाऊन हॉल, उल्हासनगर ३, जि. ठाणे येथे मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, तसेच एन.डी.एम.जे. चे राज्य महासचिव डॉ. केवल उके, राज्य सचिव वैभव गीते यांच्या प्रमुख उपस्थित तसेच अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थिती हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे आयोजक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव सर्व पदाधिकारी यांनी आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button