महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर…

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांचे विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन…
फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्राचे कार्यक्षम व लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडवणीस साहेब हे रविवार दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी फलटण दौऱ्यावर येत आहेत.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आधारस्तंभ आणि राज्याचे कार्यक्षम, लोकप्रिय मुख्यमंत्री हे रविवार दि.२६/१०/२०२५ रोजी सकाळी ९.४५ वा. फलटणला येत आहेत. यावेळी शेकडो कोटी विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रम नियोजित केले आहेत. यावेळी फलटण नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका संदर्भात आढावा सभा घेण्यात येणार आहे.
निरा-देवघर प्रकल्पातून उतरवली – खंडाळा धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पांतर्गत बंद पाईपलाईनद्वारे योजनेचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा, तसेच त्यापुढील टप्प्याचे भूमिपूजन करणार आहेत. नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून हजारोंच्या भविष्याचे दालन खुले करणार आहेत. विविध कंपन्यांचे प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पाहणी व आढावा बैठक होणार आहे. याशिवाय दहिवडी – फलटण रस्त्याचे भूमिपूजन, फलटण नगरपालिका क्षेत्रातील रस्ते व उद्घाटने, पोलीस स्टेशनची उद्घाटने, १०० कोटीची प्रशासकीय इमारत व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय भूमिपूजन, बारामती प्रमाणे फलटणमधून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्याचे सुशोभिकरण प्रकल्प, फलटणमधील ८५ कोटीच्या काँक्रीट रिंग रोडचे काम, सेशन कोर्ट, महसूल भवन, साखरवाडी तहसील व पोलीस कार्यालय इत्यादी अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

फलटणचा भविष्यकाळ व विकास कसा असेल, यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधींची घोषणा होणार आहे. हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर, मुख्यमंत्री महोदयांच्या या कार्यक्रमातून आपल्याला समजणार आहे.. यासाठी हजारोंच्या संख्येने सर्व बंधू- भगिनींनी उपस्थित रहावे असे माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सचीन पाटील यांनी आवाहन केलेले आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



