ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस शहरात महापुरुष व लोकप्रतिनिधी यांचे फोटो चौकाचौकात झळकले…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार निधीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायत हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी व परिसर सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंजूर केलेला आहे. त्यामुळे डॉक्टर आप्पासाहेब देशमुख मित्र परिवाराचे सर्वेसर्वा स्वीकृत नगरसेवक धनाजी देवकर यांनी महापुरुष व लोकप्रतिनिधी असलेले बॅनर चौकाचौकात झळकवले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अजितदादा पवार यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास २ कोटी रुपये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास १ कोटी रुपये, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास ७५ लाख रुपये, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास ५० लाख रुपये असा भरघोस दमदार निधी नगर पंचायत हद्दीतील महापुरुषांना अथक परिश्रम घेऊन मंजूर केलेला असल्याने माळशिरस शहरात चौका चौकात महापुरुष असलेले डिजिटल झळकत आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे कार्यकर्ते व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील असे लोकप्रतिनिधी असणारे बॅनर चौकाचौकात झळकत आहेत.

माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले की, अनेक दिवसापासून महापुरुषांचे स्मारक व परिसर विकासासाठी भरघोस निधीची आवश्यकता होती. समाज बांधवांची इच्छा होती. स्मारकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. समाजाची मागणी व नगरपंचायतीचा पाठपुरावा यामुळे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी तांत्रिक अडचणीमुळे निधी उपलब्ध होऊ शकला नाही. लवकरच भविष्यात दोन्ही पुतळ्यांचा प्रश्न मार्गी लावून सदरच्या स्मारकास सुद्धा निधी उपलब्ध केला जाईल, असे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort