पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार
पुणे (बारामती झटका)
‘महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास’ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ सन २०२४-२५ यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण केंद्रीय मंत्री गृह व सहकार मंत्रालय अमित शहा यांच्या शुभहस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ४.३५ वा. बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असणार आहेत. तर, विशेष उपस्थितीत मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय, प्रा. राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री, दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री, डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद, योगेश कदम राज्यमंत्री ग्रामविकास व पंचायत राज, श्रीमती माधुरी मिसाळ राज्यमंत्री नगर विकास व सामाजिक न्याय, श्रीमती सुजाता सौनिक (भा.प्र.से.) मुख्य सचिव महाराष्ट्र शासन आदी मान्यवर असणार आहेत.

तरी प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एकनाथ डबले (भा.प्र.से.) प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राजमंत्री, चंद्रकांत पुलकुंडबार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त पुणे विभाग, डॉ. राजाराम दिघे संचालक, ग्रामीण गृहनिर्माण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.