ताज्या बातम्यासामाजिक

सोलापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) श्री. गणेश बी. मोरे यांची नियुक्ती…

सोलापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र विकास सेवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस तेवीस गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये जिल्हा परिषद धुळे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. या पदावर कार्यरत असणारे श्री. गणेश बी. मोरे यांची सोलापूर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. या पदावर नियुक्ती झालेली आहे. सदर नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासन अवर सचिव डॉ. उर्मिला जोशी यांनी डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे ओएसडी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. ईशाधिन शेळकंदे यांची बदली झालेली होती. त्यांचा पदभार सोलापूर जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button