राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्यामुळे मुंगुसकर परिवार यांना ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून पहिल्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली….
वेळापूर ग्रामपंचायतच्या बिनविरोध उपसरपंच पदी नानासाहेब मुंगूसकर यांची निवड, कार्यकर्त्यात जल्लोष व आनंदोत्सव साजरा..
वेळापूर (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंगूसकर परिवार यांना ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.
वेळापूर तालुका माळशिरस ग्रामपंचायतीचे उपसरपंच तानाजीराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी बिनविरोध नानासाहेब मुंगूसकर यांची निवड झालेली आहे. बिनविरोध उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर यांचा सन्मान राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी वेळापूरचे माजी सरपंच माणिकराव चव्हाण दूधगंगा दूध सोसायटीचे चेअरमन तानाजीराव मुंगूसकर विद्यमान सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामपंचायत माजी सदस्य युवा नेते सुनील मुंगुसकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंत उर्फ दादाराजे घाडगे, युवा नेते संदीप तात्या माने देशमुख, आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद उर्फ पप्पू सरतापे, मावळते उपसरपंच तानाजीराव चव्हाण, निवृत्ती भुसारे युवा नेते संजय मुंगूसकर, दादा मुंगुस्कर युवा नेते महावीर मुंगूसकर सुरेश जगदाळे विनायक माने रघुनाथ गोलारे दीपक माने देशमुख दादासाहेब तुपे अंकुश तुपे शिवप्रसाद देशपांडे इंग्लिश स्कूल वेळापूर पालक संघाचे उपाध्यक्ष संजय काका देशपांडे शंकर आडत युवकांचे आयडॉल जवान माने देशमुख, संजय मंडले हनुमंत वायदंडे काशिनाथ आडत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.
वेळापूर गावामध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी लोकांनी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच काही ठराविक लोकांच्या घराण्याभोवती फिरवलेले आहे उत्तमराव जानकर यांनी वेळापूर ग्रामपंचायत वर सत्ता स्थापन केल्यापासून सर्वसामान्य व वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार रजनीश बनसोडे यांनी टेलरिंग चा व्यवसाय केलेला होता अशा सर्वसामान्य व जनतेमध्ये असणाऱ्या कुटुंबातील युवकाला संधी देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे उपसरपंच पदी तानाजीराव चव्हाण हे उदरनिर्वाह करता टमटम चालवीत असतात त्यांना उपसरपंच पदी निवड केलेली आहे कष्टाळू माणसाला ग्रामपंचायत मध्ये सेवा करण्याची संधी दिलेली आहे चव्हाण परिवार यांच्यामध्ये माणिकराव चव्हाण यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळलेली होती मुंगूसकर परिवारातील अनेक सदस्यांनी सत्ताधारी माने देशमुख यांचे दोन गट यांच्या समवेत अनेक वर्ष राजकारणात साथ दिलेली आहे मात्र मुंगुसकर परिवारातील कोणालाच प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली नव्हती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी मुंगूसकर परिवारातील तरुण तडफदार व उमदे नेतृत्व नानासाहेब मुंगूसकर यांना उपसरपंच पदी बिनविरोध निवड केलेली असल्याने मुंगूसकर परिवार यांनी आनंद उत्सव व जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे नानासाहेब मुंगूसकर यांच्या उपसरपंच पदावर निवडीने वेळापूरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे दूध संस्थेचे चेअरमन तानाजीराव मुंगुसकर यांचा उघड उघड पाठिंबा राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांना असणार आहे त्यामुळे प्रस्थापित असणारे माने देशमुख घराण्यातील नेतृत्वांना घरघर लागणार असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!
Your humor made this topic so engaging! For further reading, click here: DISCOVER MORE. Looking forward to the discussion!