ताज्या बातम्याराजकारण

भावी आमदार रणजीतभैया शिंदे माळशिरस तालुक्यातील युवकांचे आयडॉल तर वृद्धांचे आधारस्तंभ बनलेले आहेत.

महाळुंग (बारामती झटका)

माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन भावी आमदार रणजीतसिंह बबनराव शिंदे माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या 14 गावांमधील युवकांचे आयडॉल तर वृद्धांचे आधारस्तंभ बनलेले आहे.
माढा विधानसभा मतदारसंघाचे सहा टर्म प्रतिनिधित्व करीत असलेले लोकप्रिय व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना आ. बबनदादा शिंदे यांनी मंत्रीपदापेक्षा शेतकरी यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन मंत्री पद नाकारून दुष्काळी असणाऱ्या माढा तालुक्याला हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून साकार केलेले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

2009 साली मतदार संघाची फेररचना होऊन माळशिरस तालुक्यातील 14 गावे माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत. तीन टर्म आ. बबनदादा शिंदे यांना चौदा गावातील मतदारांनी भरभरून मतदान केलेले आहे. आ. बबनदादा शिंदे यांनी सुद्धा मतदारांच्या मताचा आदर करीत विकासकामे केलेली आहेत. व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आ. बबनदादा यांच्या समवेत युवा नेते रणजीतभैया शिंदे यांनी आपल्या कार्यातून व जनसंपर्कामधून स्वतःची वेगळी ओळख माळशिरस तालुक्यातील 14 गावांमध्ये निर्माण केलेली आहे.

युवा नेते रणजीतभैया शिंदे यांनी मताचा व विकासकामाचा एवढाच संबंध ठेवलेला नाही. तर, त्यांनी 14 गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर आपल्या विचारांची व रक्ताची माणसे निर्माण केलेली आहेत. माळशिरस तालुक्यातील 14 गावांमध्ये तीन टर्म आमदार बबनदादा यांची होत असताना जनसंपर्कामधून रणजीतभैया शिंदे यांनी तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेली आहे. ते माळशिरस तालुक्यातील मतदार संघातील जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणी कायम सोडवत असतात, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. चौदा गावातील तरुण पिढी रणजीतभैया यांच्या जनसंपर्क व कार्यावर समाधानी आहे. कोणत्याही कार्यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. याचाच प्रत्यय पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त आलेला आहे. 14 गावांमधून 520 रक्ताच्या पिशव्या संकलित झालेल्या आहेत. संपूर्ण तालुक्यातसुद्धा एवढा आकडा झाला नाही तेवढा 14 गावातील जनतेने रक्तदान करून शिंदे परिवार यांच्याशी रक्ताचे नाते असल्याचे सिद्ध केलेले आहे. माढा मतदार संघात एकाच दिवशी 10,555 रक्त पिशव्यांचा संकल्प होता. त्याहीपेक्षा जास्त रक्त पिशव्या करण्यामध्ये शिंदे परिवार यशस्वी ठरलेला आहे. नेत्र तपासणी शिबिरामुळे वयोवृद्ध व्यक्तींना याचा फायदा होऊन वृद्धांचे व ज्येष्ठ नागरिकांचे शिंदे बंधू आधारस्तंभ ठरीत आहेत.

पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीतभैया शिंदे मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करीत आहेत. पूर्वीच्या काळी 14 गावातील जनता स्थानिक नेतृत्वात दबावाखाली राहत होती. अनेकांचे उसाचे, पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व अडचणी दूर करीत आणलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार म्हणून युवा नेते रणजीतभैया शिंदे यांच्याकडे पाहिले जाते‌. भविष्यात माढा विधानसभा मतदार संघात असणारी माळशिरस तालुक्यातील 14 गावातील तरुण वर्गाचा रणजीतभैया शिंदे यांना आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा राहणार असल्याचे तरुणाई मधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button