राम सातपुते यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करू – महेश नाना साठे
सर्व मित्रपक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, राम सातपुते यांचे अभिवचन
पंढरपूर (बारामती झटका) वारकरी साभार
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे महेश नाना साठे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये बोलताना ते म्हणाले की, राम सातपुतेंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करून निवडून आणण्यासाठी काम करू, असे आश्वासन दिल्याने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मोठे पाठबळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा यांच्या लक्ष्मी टाकळी, पंढरपूर येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीस सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्यासह शिवसेना पक्षाचे लोकसभा सोलापूर महिला आघाडी सौ. अनिताताई माळगे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, सौ. मोबीना मुलाणी, सौ. आरती बसवंती, प्रियंका परांडे, दिलीप भाऊ कोल्हे, उमेश गायकवाड, दादासाहेब पवार, संतोष जाधव सर, शिवाजी बाबर, सौ. मुक्ताताई खंदारे, सौ. यास्मिन पठाण, स्वाती मॅडम, महेश ताठे, महादेव भोसले, सरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, पवार मॅडम, जाधव मॅडम, प्रीतम जाधव, सरपंच विक्रम आसबे, विकी मेटकरी, शुभम लकेरी, संजय सरवले, भाऊ कदम व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये २०१४ पासून ते २०२४ पर्यंत सातत्याने पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना आजपर्यंत मोठे लीड मिळवून दिले आहे. या लीडमध्ये अधिकची भर नक्कीच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी घालण्यात कमी पडणार नाही व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करून काम करून अधिकचे लीड देऊ, असे आश्वासन सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वतीने महेश नाना साठे यांनी उमेदवार राम सातपुते यांना दिले.
यावेळी राम सातपुते यांनी मित्र पक्षांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल. त्याचबरोबर निधीच्या किंवा विकास कामाच्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे अभिवचन यावेळी राम सातपुते यांनी दिले. विकासाच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सोलापूर लोकसभेमध्ये विकासाच्या बाबतीत देखील कुठेही मी कमी पडणार नाही. मी एक सर्वसामान्य उसतोड कामगाराचा मुलगा आज कष्टातून व स्वकर्तुत्वातून या ठिकाणी पोहोचलो आहे. म्हणून मला सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे नक्कीच मी चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकतो आणि मला त्याची आवड आहे, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास जवळपास ३०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर राम सातपुते देखील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादीचे इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा