डॉ. विश्वतेज थोरात यांचे वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश

इंदापूर (बारामती झटका)
डॉ. विश्वतेज विष्णू थोरात यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बी. ए. एम. एस. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉक्टर विश्वजीत थोरात यांचे मूळ गाव मळोली, ता. माळशिरस, हे आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. आर्थिक परिस्थिती जेमतेम. डॉ. विश्वजित थोरात यांचे आई-वडील उद्योग-व्यवसायानिमित्त वडापुरी ता. इंदापूर येथे आले होते. त्याठिकाणीच त्यांचा व्यवसाय सुरु आहे. थोरात परिवार सांप्रदायिक आणि सुसंस्कृत आहे. घरामध्ये विविध क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय सुरु आहे. आणि आता डॉ. विश्वतेज थोरात यांनी कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करून बी. ए. एम. एस. या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. डॉ. विश्वतेज थोरात यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण नारायण रामदास प्राथमिक शाळा, इंदापूर येथे झाले. तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण नारायण रामदास हायस्कूल, इंदापूर येथे झाले. तसेच अकरावी व बारावी राजमाता अहिल्याबाई होळकर ज्युनिअर कॉलेज, इंदापूर येथे झाले. तर बी. ए. एम. एस. आर्यगर्ल शासकीय आयुर्वेद मेडिकल कॉलेज, सातारा येथे झाले.

कठोर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बी. ए. एम. एस. ही पदवी मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले. त्यामुळे परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मळोली, वडापुरी आणि इंदापूर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.