राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी अनिकेत मुंडफणे पाटील यांची नियुक्ती

माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी महाळुंग ता. माळशिरस येथील अनिकेत भाऊसाहेब मुंडफणे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
सदर नियुक्ती पत्रात असे नमूद करण्यात आले आहे कि, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज (दादा) चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार साहेब यांच्या विचारानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात महाळुंग गावचे युवा नेतृत्व यांना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात काम करण्याची संधी कार्यकर्तृत्वातून मिळाली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अनिकेत मुंडफणे जिल्हा सरचिटणीस पदावर पाच वर्ष काम केलेले आहे. माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाचा गवगवा असून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. केलेल्या कामाची योग्य पावती म्हणून सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
नूतन जिल्हाध्यक्ष अनिकेत मुंडफणे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असताना महिला राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या विचाराने काम करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ग्रामीण भागातील तळागाळात, वाड्यावस्त्यांवर पोहोचविण्याचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी निष्ठेने काम केल्यामुळे त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील 14 गावांमध्ये समन्वयाचे काम अनिकेत मुंडे यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या विचाराने जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात जोमाने काम करण्याचे सुरू आहे

वरिष्ठांनी टाकलेला विश्वास ते निश्चितपणे सार्थ करतील व आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून अजितदादांच्या विचारांचे जास्तीत जास्त सदस्य, उमेदवारांना सहकार्य करून भविष्यामध्ये राष्ट्रवादी ग्रामीण भागामध्ये रुजविण्याचे काम ते करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निश्चितपणे भविष्यात अजितदादा पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून राष्ट्रवादीची पाळेमुळे खेडोपाडी वाड्यावर पोचविण्यासाठी सर्वतोपरी काम करून टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत मुंडपणे पाटील यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.