ताज्या बातम्या

सदाशिवनगर येथे अंबिका उर्फ वैदेही हिच्या प्रथम वाढदिवसाच्या दिवशी गोकुळ अवतरले…

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस, येथील पालवे परिवार यांच्या अंबिका उर्फ वैदेही सागर पालवे या चिमुकलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सदाशिवनगर येथील शिवामृत भवन येथे गोकुळ अवतरले होते.

सदाशिवनगर येथील श्री. शिवाजी पालवे शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेले सोज्वळ व शांत स्वभावाचे. त्यांनी शेतीबरोबर सागर हॉटेलमध्ये ग्राहकांच्या तीन पिढ्यांची चव घेणारी जीभ बदलली मात्र, सागर हॉटेलच्या जेवणाची चव कायम ठेवून हॉटेल व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. त्यांना धर्म पत्नी म्हणून फोंडशिरस येथील वाघमोडे घराण्यातील सौ‌. ताई लक्ष्मीच्या रूपाने मिळाल्या. सुखद संसार सुरू झाला. पालवे दांपत्ये यांना सागर आणि सुहास अशी दोन मुले आहेत. आई-वडिलांचा वसा आणि वारसा घेत सागर यांनी हॉटेल व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविला. बदलत्या काळानुसार जुन्या हॉटेलची कात टाकून सध्या दोन मजली हॉटेलची इमारत उभी केलेली आहे. सागर यांना फोंडशिरस येथील वाघमोडे परिवारातील काजल धर्मपत्नी लाभलेल्या आहेत‌. ताई यांच्या पावलावर पाऊल ठेवून काजल यांचे घरामध्ये सुसंस्कृतपणाने कामकाज सुरू आहे. काजल व सागर यांना गेल्या वर्षी कन्यारत्न प्राप्त झालेले होते. घरामध्ये कन्यारत्न झाल्याने आफाट आनंद झालेला होता.

घरामध्ये सोन पावलाने आलेली अंबिका उर्फ वैदेही परिवाराची लाडकी परी झाली. दिवसा मागून दिवस जात होते. अंबिका एक वर्षाची झाली. प्रथम वाढदिवस मोठ्या थाटामाटात करावयाचा. मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या समवेत पहिला वाढदिवस करण्याकरता आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी घराशेजारी असणाऱ्या शिवामृत भवन येथे प्रथम वाढदिवसानिमित्त तयारी सुरू केली. संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्याने गजबजुन गेलेला होता. वैदेहीच्या अनेक मुद्रा टिपलेले क्षणचित्र त्याचे बॅनर बनवलेले होते. वेगवेगळ्या रूपामध्ये वैदेही शोभून दिसत होती. लाईट, डेकोरेशन, स्टेज सजावट अशा पद्धतीने केलेली होती ज्याप्रमाणे गोकुळ अवतरावे. अशा पद्धतीचे मंगलमय वातावरण तयार झालेले होते‌. अशा वातावरणात अंबिका ऊर्फ वैदहीचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता. पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविलेली होती. सदरच्या वाढदिवसाचा कार्यक्रम हरिभाऊ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

सदरच्या कार्यक्रमास महिला भगिनी व लहान मुलांची विशेष उपस्थिती होती. आलेल्या सर्व लोकांची भोजनाची सोय केलेली होती. पालवे परिवार यांनी अंबिका उर्फ वैदेही हिचा वाढदिवस मुलापेक्षा मुलीला जास्त महत्त्व देऊन आनंदाने साजरा केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button