जिल्हा परिषद सोलापूरमध्ये विकासाचा नवा वेग, स्थायी समिती सभा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न

सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवरत्न सभागृह येथे स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सभेला अध्यक्ष तथा सभापती स्थायी समिती दीपक वैद्य अध्यक्षस्थानी होते. सभेस उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती इंद्रजीत पवार, सभापती शिक्षण व आरोग्य समिती चेतनसिंह केदार सावंत, सभापती कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती रामपा चिवडशेट्टी, सभापती महिला व बालकल्याण समिती अमृता वाघे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे, रमेश भांजे उपस्थित होते.
प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) व सदस्य सचिव स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे,आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील यांनी माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विषय समित्यांच्या सभापती, स्थायी समितीचे सदस्य आणि उपस्थित विभाग प्रमुख अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यानंतर विभाग प्रमुखांकडून शासनाकडून प्राप्त महत्त्वाची परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विशेषतः आरोग्य विभागासंबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण व सखोल चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील सेवा सुधारणा, औषधसाठा, मनुष्यबळ उपलब्धता, तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सभेत गांभीर्याने विचारमंथन झाले. विविध विभागांतील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांची गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



