कृषिवार्ताताज्या बातम्याविशेष

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा भ्रम निराश झाला.

भीक नको पण, कुत्रा आवरा… अशी सभासदांवर म्हणण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे, विस्तारीकरणापेक्षा नियोजन करा सभासदांची मागणी..

यशवंतनगर (बारामती झटका)

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर, अकलूज या सहकारी साखर कारखान्याची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७/०९/२०२३ रोजी संपन्न झाली. कारखाना प्रशासनाकडून सभासदांचा सर्वसाधारण सभेत भ्रमनिराश झालेला आहे. गाळप झालेल्या उसाला अंतिम दर किती देणार, याचा उलगडा झालेला नाही. पुढील कारखान्याच्या गाळपाची व दराची दिशा ठरलेली नाही. मात्र, कारखान्याच्या गाळपाची क्षमता वाढविण्याचा विषय आल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. भीक नको पण, कुत्रा आवरा, अशी सभासदांवर म्हणण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करण्यापेक्षा योग्य नियोजन व काटकसर करून सभासदांना जास्तीत जास्त ऊसाला दर मिळाला पाहिजे, याचे नियोजन करावे अशी सभासदांमधून मागणी होत आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकालातील व नंतर नव्याने झालेले सहकारी साखर कारखाने सहकार महर्षीपेक्षा जादा दर देत आहेत. सहकार महर्षी साखर कारखान्याची साखर उत्पादित करण्याचा खर्च व सोमेश्वर माळेगाव इतर कारखान्याचा उत्पादित साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने योग्य नियोजन करून साखर उत्पादित करण्याचा खर्च कमी करून सभासदांचे हित जोपासणे गरजेचे आहे. सध्या साडेसात हजार मॅट्रिक टन गाळप क्षमता असणारा कारखाना साडेदहा हजार बॅटरी टन गाळप क्षमतेची विस्तार वाढ करण्याचा निर्णय सभासदांना मान्य नाही. कारण कारखाना नऊ लाख टनपर्यंत गाळप करेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. कारखाना सुस्थितीत चालल्यानंतर १३ ते १४ लाख टन गाळपापर्यंत गाळप केलेले आहे. हा कारखाना गाळपाचा इतिहास आहे.

सध्या माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यात दर कमी भेटत असल्याने तालुक्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ऊस पाठवत आहे. जर सहकार महर्षी कारखान्याने चांगल्याप्रमाणे गाळप व योग्य नियोजन करून बाहेरच्या कारखान्यासारखे उसाचे बिल अदा केले तर गाळपासाठी ऊस भरपूर येणार आहे. सभासदांचे हित जोपासायचे असेल तर चांगला दर देणे गरजेचे आहे. सभासदांच्या डोक्यावर ६३ वर्ष कर्जाचा डोंगर राहिलेला आहे. आत्ता कारखान्याचे कर्ज फिटत आलेले असल्याने सभासदांमध्ये समाधान होत असताना विस्तारीकरणाचा विषय आल्यानंतर सभासदांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. पुन्हा आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर राहणार अशी धारणा सभासदांची झालेली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये उत्पादक सभासद स्तब्ध होते. सभासद नसणाऱ्यांनी विषय वाचण्याच्या अगोदरच मंजूर म्हणण्याचा सपाटा लावलेला होता. त्यामुळे सभासद यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. स्टेजवर बसलेल्या मंडळींनासुद्धा विस्तारीकरणाचा निर्णय आवडलेला नसणार, अशी दबक्या आवाजात सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे. सभासदांची केवळ चर्चाच राहणार आहे. कारण, कारखाना प्रशासन यांना बोलण्याची हिंमत सभासद ठेवत नसल्याने पाठीमागील दिवस पुढे येणार असल्याचे सुज्ञ सभासदांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. Excellent article! I appreciate the thorough and thoughtful approach you took. For more details and related content, here’s a helpful link: LEARN MORE. Can’t wait to see the discussion unfold!

Leave a Reply

Back to top button