आरोग्यताज्या बातम्याविशेषसामाजिक

९० टक्के आजारांचं एकच मूळ, जे तुम्हालाही माहीत असलं पाहिजे!

मुंबई (बारामती झटका)

आजकाल कमी वयातच मोठमोठे आजार होतात. २० ते ३० वयातही लोकांना डायबिटीस, हार्ट अटॅक, कॅन्सर, फॅटी लिव्हर आणि अनेक आजारांची लक्षणे दिसतात. चिंताजनक बाब म्हणजे यातील अनेक आजारांचे संकेत रूग्णांना माहीत नसतात. जेव्हा आजार शेवटच्या स्टेजमध्ये पोहोचतो तेव्हा उपचार करणं अवघड होतं.

या आजारांपासून वाचवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे या आजारांच्या कारणांपासून दूर राहणं आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सांगितलं की, ९० टक्के आजारांचं मूळ तुमच्या लाइफस्टाईलची चॉईस असते. इतर १० टक्के आजार जेनेटिक्स असतात म्हणजे अनुवांशिक असतात.

लाइफस्टाईल चॉइसचा अर्थ –

तुमच्या लाइफस्टाईलचा तुमच्या आरोग्यावर जास्त प्रभाव पडतो. तुम्ही रोज कसं जीवन जगता यावरच तुमचं आरोग्य अवलंबून असतं. यात तुम्ही काय खाता, कोणती एक्सरसाइज करता आणि कोणत्या पेयांचं सेवन करता यांचा समावेश आहे. या गोष्टी सुधारण्यासाठी न्यूट्रिशनिस्टने ३ कामे करण्याचा सल्ला दिला आहे.

१) जेवणापासून करा सुरूवात –

लाइफस्टाईल सुधारण्यासाठी सगळ्यातआधी प्लेटवर लक्ष द्या. आपल्या डाएटमध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी कार्ब्स, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश करा. अनहेल्दी फूड्स, ट्रांस फॅट्स, हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स आणि जास्त मिठाचं सेवन बंद करा.

२) चालणं-फिरणं सुरू करा –

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. वर्कआउट आणि योगा फक्त तुम्हाला डायबिटीस, कॅन्सर किंवा कार्डियोवस्कुलर डिजीजपासूनच दूर ठेवत नाही तर शरीरालाही ताकद देतात. पण लोक नेहमीच हे कारण सांगतात की, त्यांना एक्सरसाइजसाठी वेळ मिळत नाही. अशा लोकांनी घरीच १० मिनिटे व्यायाम केला किंवा चालणं फिरणं केलं तर फायदा मिळतो पायऱ्या चढल्या आणि उतरल्या तरी तुम्हाला फायदा मिळेल.

३) टॉक्सिनपासून दूर रहा :

अनेक प्लांट्स आणि प्राणी टॉक्सिन तयार करतात. जे आपल्या शरीरासाठी घातक असतात. सिगारेट, तंबाखू, दारू यांमध्ये टॉक्सिन भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराला आतून सडवतात. या टॉक्सिनना जास्तकरून कॅन्सरचं मूळ मानलं जातं. त्यामुळे यांचं सेवन बंद केलं पाहिजे.

संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
मो. ९४२३३३२२३३

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button