संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल…..
भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव विजय कावळे यांच्या तक्रारी अर्जावरून पोलीस निरीक्षक भानुदास रघुनाथ निंभोरे तपास करीत आहेत…
अकलूज (बारामती झटका)
संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील त्यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल झालेला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 कलम 281, 125, 352 मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 184 नुसार भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष महादेव विजय कावळे यांच्या तक्रारी अर्जानुसार दाखल झालेले आहे. सदर तक्रारीचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास रघुनाथ निंभोरे तपास करीत आहेत.
महादेव विजय कावळे वय 41 वर्ष, रा. रामबाग, अकलूज भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवितास संरक्षण मिळावे असा अर्ज अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता. सदरच्या अर्जामध्ये अकलूज मधील हा सत्तासंघर्ष प्रस्थापित मोहिते पाटील यांचे विरोधात असल्याने या सत्ता संघर्षाचा परिणाम म्हणून व्यक्तीश: मला आमचे साथीदार योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल उर्फ भैय्यासाहेब किसन मोरे वय 33 वर्षे, रा. पंचशील नगर, अकलूज यांचे विरोधात संपूर्ण मोहिते पाटील परिवार असून हस्ते पर हस्ते ते जीवघेणा हल्ला करण्याची त्यांचा पूर्व इतिहास पाहता दाट शक्यता असल्याने आमचे जीविताचे बरे वाईट होऊ नये व असे झाले तर याला सर्वस्वी जबाबदार जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील, रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील हेच जबाबदार राहतील. म्हणून हा अर्ज देत आहे.
दि. 22/01/2025 रोजी सदभाऊ चौकात रात्री 10.30 वाजता चे दरम्यान गाडी वारंवार जवळून घेऊन जाऊन दहशत माजविण्याचा प्रकार केल्याने या कारणास्तव आमचा दृढ समज व खात्री झाल्याने हा तक्रार वजा प्रिकॉशन म्हणून अर्ज देत आहे. असा अर्ज अकलूज पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर सदर तक्रारीच्या अनुषंगाने अकलूज पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल झालेला आहे.
अकलूज पोलीस स्टेशन येथे एफआयआर मध्ये मी माझा मित्र अनिल किसन मोरे, लक्ष्मण सदाफुले, ओंकार चंदनशिवे असे आम्ही अकलूज शहरामध्ये फेरफटका मारत सदुभाऊ चौक, अकलूज येथे आलो होतो. त्यावेळेस आम्हाला शिवलीला कार डेकोरेटेड या दुकानचे समोर संग्रामसिंह मोहिते पाटील त्यांचा मुलगा सयाजीराजे मोहिते पाटील, मनोज रेळेकर व त्यांचे सोबत आणखीन काही लोक एकत्र जमलेले दिसले. त्यामुळे ते लोक तेथे का जमले हे पाहण्यासाठी आम्ही दोघे सदाभाऊ चौक, अकलूज येथे थांबलो असता ते लोक आमच्याकडे पाहून शिवीगाळ करीत होते. परंतु, आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर थोड्या वेळाने आमचे समोरून एक पांढऱ्या रंगाची एमजी हेक्टर कंपनीची चार चाकी गाडी वेगाने प्रतापसिंह चौकाकडे गेली व काही अंतरावरून सदाशिव माने विद्यालयाचे मेन गेट समोरून वळून रस्ता दुभाजकाचे दुसऱ्या बाजूने पुन्हा भरधाव वेगात आली. गाडीचा नंबर एमएच 45 AE 9090 असा होता व संग्राम सिंह मोहिते पाटील हे गाडी चालवत होते. त्यानंतर सदरची गाडी पुन्हा सदाभाऊ चौक, अकलूज येथून वळून संग्रामसिंह मोहिते पाटील हे आमचे जवळून भरधाव वेगाने बेदरकारपणे गतीने गाडी चालवत प्रतापसिंह चौकाचे दिशेने सदुभव माने विद्यालयाचे समोर दक्षिण दिशेचे गेटपर्यंत गेले व त्यानंतर गेटमधून गाडी आतमध्ये घेऊन गेले होते. त्यामुळे आम्ही ते दहशत पसरवण्याचा प्रयत्न पाहून तक्रार द्यायची म्हणून परत गेलो होतो व आत्ता पोलीस ठाणे येथे येऊन त्यांचे विरुद्ध तक्रार देत आहे.
दि. 22/01/2025 रोजी रात्री 10:40 वाजण्याचे सुमारास सदाभाऊ चौक, अकलूज येथून संग्रामसिंह मोहिते पाटील रा. अकलूज, ता. माळशिरस हे त्यांच्या ताब्यातील एमजी हेक्टर कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम एच 45 AE 9090 ही भरधाव वेगाने बेदरकारपणे गतीने निष्काळजीपणाने सार्वजनिक रस्त्यावरून चालवून आमची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली आहे. म्हणून त्यांचे विरुद्ध तक्रार आहे, असा टंकलिखित फिर्यादी जबाब महादेव कावळे यांनी दिलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.