अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या टीमची कामगिरी…

चोरीच्या आठ मोटार सायकली जप्त…
अक्कलकोट (बारामती झटका)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, समर्थ कामाठी (वय २५ रा. अक्कलकोट) यांनी दि. ११ जानेवारी रोजी अक्कलकोट येथील फतेसिंह मैदानाचे मेन गेट समोर लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेस अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल होता. त्यानंतर १६ जानेवारी २०२५ रोजी फतेसिंह मैदानाचे मेनगेट समोरून दुसरी मोटारसायकल चोरीस गेल्याने सदरबाबत रमेश ममाणे यांनी फिर्याद दिली होती.
पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पवार व डी. बी. पथकातील अंमलदारांना यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील मोटार सायकल चोराचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. डी. बी. पथकातील पोलिस उपनिरीक्षक पाडुरंग पवार, पो.हे.को. महादेव चिंचोळकर, गणेश अंगुले, प्रमोद शिंपाळे, शिवलिंग स्वामी, श्रीकांत जवळगे, केदार सुतार यांनी केली.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत दुचाकी चोरांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल क्रमांकावरुन आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपींना अटक करुन त्यांचे ताब्यातून एकूण ८ दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी दिली. याप्रकरणी आरोपी सिद्धाराम ज्योते, लक्ष्मण माने (दोघे रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांना ताब्यात घेतले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.