मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जयसिंग उर्फ बाबा सुखदेव रणनवरे यांची बिनविरोध निवड…

मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने व वस्ताद तानाजी रणनवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली…
मांडकी (बारामती झटका)
मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्री. जयसिंग उर्फ बाबा सुखदेव रणनवरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी श्री. अशोकराव रणनवरे, यशवंत रणनवरे, पोपट आबा रणनवरे, उदयसिंह रणनवरे, शिवाजी रणनवरे, श्रीमंत रणनवरे, मोहन रणनवरे, जयराम रणनवरे, उद्धव रणनवरे, अभिजीत रणनवरे, वेंकट रणनवरे, प्रशांत रणनवरे, पिंटू डॉक्टर, तुळशीराम कोकरे, बाळासाहेब निकम, मोहन जगदाळे, धुळा कोकरे, जनार्दन रणनवरे, स्वाती रणनवरे, अरविंद निंबाळकर, महादेव गायकवाड, दुर्योधन गायकवाड, सुखदेव ननवरे, अनिल चव्हाण, जगदीश चव्हाण, शंकर कदम, जयसिंग रणनवरे, जीवन रणनवरे, विजय गायकवाड, मेजर अमोल भोसले, अनिल रणनवरे, चंद्रभागा निंबाळकर, बाळू दीक्षित, विजय दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सुधाकर गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदी बिनविरोध चेअरमन जयसिंग उर्फ बाबा सुखदेव रणनवरे यांची संचालक व सभासद यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली.
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अकलूज यांचे सक्षम प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने व वस्ताद तानाजी रणनवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे. बिनविरोध चेअरमन पदी श्री. जयसिंग उर्फ बाबा रणनवरे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी हलगीच्या निनादात फटाक्यांची आतीशबाजी करून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिरामध्ये वाजत गाजत आशीर्वाद घेण्याकरता रवाना झाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.