सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ…

माळशिरस येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व दिमाखात संपन्न होणार
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते माळशिरस येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता हायब्रीड ॲन्युटी मॉडेल योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कळंबोली नातेपुते शिंगणापूर रस्ता रा.मा. १२४ किलोमीटर २४/५०० ते ४९/६०० मध्ये रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा व माळशिरस येथील नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. तर विशेष उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषद सदस्य आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा सदस्य आ. राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदरचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर अधीक्षक अभियंता संजय माळी, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज सुनिता पाटील, उपअभियंता लक्ष्मण डाके, शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील, शासकीय विश्रामगृहाचे ठेकेदार क्लासिक असोसिएट्स नाशिक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.