सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष लोकअदालत

माळशिरस (बारामती झटका)
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.
ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यास ती तडजोडीने मिटवावीत अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. उपरोक्त लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा अभाषि पद्धतीने सहभागी होऊ शकतात.
जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती, माळशिरस यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी तसेच तालुका विधी सेवा समिती, माळशिरस चे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हा न्यायाधीश, माळशिरस एल. डी. हुली यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.