शरदचंद्रजी पवार यांना वाकडतोंड्या म्हणणाऱ्यांवर पवार साहेबांची तुतारी तोंडात घेण्याची दुर्दैवी वेळ येणार का ?

आली रे आली, आता माझी तुतारी तोंडात घेण्याची वेळ आली… अशी स्लोगन शरदचंद्रजी पवार यांच्या समर्थकांमधून येत आहे.
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांना नावे ठेवून शिव्या, शाप देऊन वाकडतोंड्या अशा अर्वाच्य भाषेत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तोंडाचा भडीमार व सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला होता. भारतीय जनता पक्षाने लायकी ओळखून झिडकारल्यानंतर शरदचंद्रजी पवार यांना वाकडतोंड्या म्हणणाऱ्यांनी पवार साहेबांच्या नवीन पक्षाचे तुतारी चिन्ह घेतलेले आहे. पवार साहेबांची तुतारी तोंडात घेण्याची दुर्दैवी वेळ नेत्यांवर येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांची महायुती आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर पक्षांची महाविकास आघाडी आहे. भारतीय जनता पक्षाचे जागावाटप झालेले आहे. भाजपमधील लायकी नसलेले डावलेल्या नेत्यांचे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे लोटांगण घालण्याचे काम सुरू आहे. झूल कितीही अंगावर टाकली तरी अंगावरील ओरखडे जात नसतात, त्याच पद्धतीने राजकीय चिखलफेक करून बदनाम केलेल्या लोकांची लायकी न ओळखणारे शरदचंद्रजी पवार यांच्यासारखे धूर्त राजकारणी नाहीत. त्यामुळे अनेकजण पवार साहेबांची तुतारी तोंडात घेऊन वाजवू पाहत आहेत. त्यांच्या नशिबी हातात धतुरा येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.