ताज्या बातम्यासामाजिक

कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे पिताश्री स्व. एकनाथ देशमुख यांना अभिवादन केले…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक निमंत्रित सदस्य डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे पिताश्री प्रगतशील बागायतदार स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. आप्पासाहेब देशमुख, अण्णासाहेब देशमुख, रावसाहेब देशमुख, पृथ्वीराज देशमुख, धनराज देशमुख, यशराज देशमुख यांच्यासह रणजीतसिंह भोसले, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, लतीफभाई तांबोळी, नागेश मालक वाघमोडे, जलनायक शिवराज पुकळे, विठ्ठल पालवे, ॲड. सत्यजित गलांडे, सर्जेराव पाटील, विक्रम वगरे, समाधान घुले, मनोजराव गडदे, दादासाहेब जानकर, भानुदास चोरमले आदी उपस्थित होते.

माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार कै. एकनाथ भिकू देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. २०/०३/२०२४ रोजी सकाळी १० वाजता, ६१ फाटा, माळशिरस ता. माळशिरस येथे संपन्न झाले. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन श्रीमती सजाबाई एकनाथ देशमुख, सौ. अर्चना आप्पासाहेब देशमुख (नगरसेविका, माळशिरस नगरपंचायत), श्री.आप्पासाहेब एकनाथ देशमुख (माजी नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत) सौ. अमृता व श्री. अण्णासाहेब एकनाथ देशमुख, सौ. कांचन व श्री. रावसाहेब एकनाथ देशमुख, सौ. स्वाती व श्री. विजय बाजीराव देशमुख (नगरसेवक, माळशिरस नगरपंचायत), सौ. सुजाता व श्री. गोरख हनुमंत देशमुख, सौ. जयश्री व श्री. सागर शिवाजी देशमुख यांच्यावतीने करण्यात आलेले होते. यावेळी मित्रपरिवार, नातेवाईक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई येथून खास डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे राजकीय संबंध असल्याने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहून देशमुख परिवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमांमध्ये सहभागी राहिलेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort