ताज्या बातम्याराजकारण

जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर केले…

माळशिरस (बारामती झटका)

शेतकऱ्यांचे खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्तव्यदक्ष जिल्हाअध्यक्ष तानाजीकाका बागल यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांचे राजीनामे मंजूर करून त्यांच्या जागेच्या निवडी करण्याचे अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांना पत्राद्वारे दिलेले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुक्यात कार्य जोरदार सुरू आहे. खासदार राजू शेट्टी व जिल्हा अध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ अधिक बळकट होत आहे. भविष्यामध्ये नवनवीन किंवा संघटनेमध्ये काम करीत असलेल्या इच्छुकांना संधी मिळणार आहे. राजीनामा मंजूर करून तानाजीकाका बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमान जिवंत ठेवलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort