शरदचंद्र पवार यांच्याकडून माढा मतदार संघातील धनगर समाज बांधवांच्या अपेक्षा वाढल्या….

महायुतीने परभणीची जागा महादेव जानकर यांना दिलेली आहे, महाविकास आघाडीने माढ्याची जागा धनगर समाजास मिळावी, अशी अपेक्षा…
माळशिरस (बारामती झटका)
देशामध्ये चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ४८ जागांमध्ये भाजप व महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्मातील लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. भाजप व महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवराव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. माढा लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे लक्षणीय मतदार आहेत. महाविकास आघाडीकडून शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडे असणारी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा धनगर समाजाला द्यावी, अशी धनगर समाज बांधवांची अपेक्षा आहे.
महायुतीने परभणी येथे धनगर समाजास जागा दिली आहे. महाविकास आघाडीने सुद्धा धनगर समाजाच्या मतदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माढा लोकसभेची उमेदवारी धनगर समाज बांधवांना द्यावी, अशी अपेक्षा माढा लोकसभा मतदारसंघातील वाड्यावस्त्यांवर व राणामाळात राहणाऱ्या धनगर समाज बांधवांची आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. मतदारांच्या शरदचंद्र पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवाला उमेदवारी दिल्यास धनगर समाज पाठीमागे उभा राहणार आहे. धनगर समाज बांधवास डावलल्यास आमच्या मतांची महाविकास आघाडीने अपेक्षा करू नये, असे उघड उघड धनगर समाज बांधवांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.