अकलूज येथे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चव्हाण हॉस्पिटल व सिद्धनाथ मेडिकलचा उद्घाटन समारंभ होणार

हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के इनामदार, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब मोरे महाराज, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य जे. जी. जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथे चव्हाण हॉस्पिटल व सिद्धनाथ मेडिकल जनरल सर्जरी, लेप्रोस्कोपी, प्रोक्टॉलॉजी सेंटरचा उद्घाटन समारंभ हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब मोरे महाराज, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व प्राचार्य जे. जी. जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दि. ९/४/२०२४ रोजी सकाळी १०.१५ वा. वाजता ताम्हाणे कॉम्प्लेक्स, ताम्हाणे नगर, नवीन एसटी स्टँड समोर, अकलूज येथे संपन्न होणार आहे.
सदर हॉस्पिटलमध्ये हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, आतड्यांचे आजार, मूळव्याध, भगंदर, फिशर, लघवीच्या जागेवरील फुगवटा व सूज, लघवी थेंब थेंब होणे व थांबणे, स्तनातील गाठी व आजार, जळालेल्या रुग्णांवर उपचार, मुतखड्याचे आजार, पुरुष ग्रंथीचे आजार, पित्ताशयातील खडे व आजार, सर्व प्रकारचे पोटाचे आजार, थायरॉईड व गळ्याच्या इतर गाठी, अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार तसेच सर्व प्रकारच्या गाठी आदी आजारांवर सुविधा उपलब्ध आहेत.
तरी या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव धोंडीबा चव्हाण व डॉ. अभिजीत अंकुश चव्हाण (M.M.B.S., M.S. General Surgery (FMAS) व समस्त चव्हाण परिवार, वेळापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.