शरदचंद्रजी पवार यांचे महादेव जानकर यांना निवडणूक लढवावी असा सल्ला, मात्र उमेदवारीची अधिकृत घोषणा नाही..
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशाप्रकारे भेटीगाठी, बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले, महादेवराव जानकर यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढवावी, या वाक्याने माढा लोकसभेची निवडणूक महादेवराव जानकर यांनी लढवावी, असा सल्ला दिलेला आहे. मात्र, महाविकास आघाडीची उमेदवारी बाबतची अधिकृत घोषणा नसल्याने महाविकास आघाडीची उमेदवारी महादेवराव जानकर यांना मिळणार ? का अन्य उमेदवार महाविकास आघाडीकडून मिळणार ?, याची उत्सुकता माढा लोकसभा मतदारसंघात लागलेली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजप व महायुती यांच्याकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. महायुतीमधील अजितदादा पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर व भाजप मधीलच मोहिते पाटील गटाने उघड उघड विरोधी भूमिका घेतलेली असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही. शरदचंद्रजी पवार व महादेवराव जानकर यांच्या भेटीमध्ये शरदचंद्रजी पवार यांनी निवडणूक लढवावी, असा सल्ला दिला. मात्र, उमेदवारीची अधिकृत घोषणा तुम्हालाच देऊ असे नसल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार महादेवराव जानकर ? की अन्य कोणी असणार ?, याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.