ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

ग्रामदैवत यमाई देवीला महाळूंगकरांनी ओंजळीने मागितले, दादांनी सुपाने देऊन देवीचा जीर्णोद्धार केला….

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” म्हणून तर यमाई देवीच्या आशीर्वादाने पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी मिळाली…
महाळुंग (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघातील व माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग गावचे ग्रामदैवत यमाई देवीच्या मंदिराचा अनेक दिवस जिर्णोद्धाराचा प्रश्न रखडलेला होता. सदरचा प्रश्न माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार यांनी माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला गती देऊन यमाई देवीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावलेला असल्याने ग्रामदैवत यमाई देवीला देवीभक्त व महाळुंगकरांनी ओंजळीने मागितले पण, दादांनी सुपाने देऊन देवीचा जीर्णोद्धार केला. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले”, म्हणून तर यमाई देवीच्या आशीर्वादाने माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी मिळालेली आहे. देवीचा आशीर्वाद पाठीशी कायम राहिलेला आहे. निधी मंजूर केल्यानंतर सौ. जिजामाला व श्री. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सौ. सुनंदा व श्री. बबनदादा शिंदे या उभयतांच्या शुभहस्ते यमाई देवीभक्त महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील यांनी जीर्णोद्धाराचा प्रश्न मिटल्यानंतर सुवर्ण अलंकार नवस केलेला होता. सदरचा नवास उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झालेला होता.

श्रीक्षेत्र महाळुंग येथील यमाई देवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व पुरातत्त्व खात्याची अडचण येऊ देणार नाही, असे केंद्रीय पुरातत्व मंत्री नामदार जयकिशन रेड्डी यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी महाळुंगचे ग्रामदैवत यमाईदेवी मंदिराच्या बांधकाम व परिसर विकासासाठी आयोजित केलेल्या शिष्टमंडळासमवेत बैठकीमध्ये बोलताना सांगितले होते. त्यामुळे “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले” या म्हणीचा प्रत्यय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले दोन दादांच्या कार्यातून महाळुंगकरांना प्रत्यय आलेला होता.

महाळुंग ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथील ग्रामदैवत श्री यमाईदेवीचे पुरातत्त्व मंदिर आहे. सदर मंदिराची गेल्या 40 वर्षापासून पडझड सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडे सदरचे मंदिर असल्याने माढा विधानसभेचे पाणीदार खासदार बबनदादा शिंदे यांनी निधी उपलब्ध करूनसुद्धा पुरातत्व खात्याची अडचण असल्याने मंदिराची डागडुजी व परिसर विकास करून सुशोभित करण्याची अडचण होत होती. महाळुंगकरांची व यमाई देवी भक्तांची मनोमन इच्छा होती. यमाई देवीचे पुरातत्व मंदिर जतन करणे गरजेचे होते. यासाठी आ. बबनदादा शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचेही केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न सुरू होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनदादा शिंदे श्रीपुर-खंडाळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या वेळी यमाई देवीचे दर्शन घेऊन उपस्थितांना शब्द दिलेला होता. पावसाळी अधिवेशनात आपला प्रश्न आठच दिवसात मार्गी लावण्याचे यमाई देवीच्या प्रांगणामध्ये शब्द दिलेला होता, तो शब्द पूर्ण केलेला आहे.

दिल्ली येथील संसदभवन येथे पुरातत्व विभागाचे केंद्रीय मंत्री नामदार जयकिशन रेड्डी यांच्या समवेत महाळुंग यमाई देवी शिष्ट मंडळाची बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या शिष्ट मंडळामध्ये महाळुंग-श्रीपुर नगर पंचायतीचे नगराध्यक्षपती श्री. अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, युवा नेते नगरसेवक विक्रमसिंह लाटे पाटील, प्रसन्न कुलकर्णी, युवा नेते सुजित सावंत पाटील आदी शिष्टमंडळ समवेत पत्रकार अभिराज उबाळे सचिन कसबे, भारत नागणे, रविराज लव्हेकर, श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मंदिराची संपूर्ण माहिती सांगून सध्याची परिस्थिती सांगितली. मंदिराची पडझड झालेले फोटो दाखवले. यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील ते करून निधीची उपलब्धता करण्याची मागणी केली. मंदिराच्या बांधकाम व परिसर विकासासाठी पुरातत्त्व विभागाची अडचण दूर करण्याचे सांगितले. पुरातत्त्व मंत्री ना. जयकिशन रेड्डी यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व शिष्ट मंडळ यांचे म्हणणे ऐकून घेतले. यमाई देवी मंदिर विकासासाठी आराखडा तयार करा, केंद्राकडून आर्थिक मदत व विभागाची अडचण राहणार नसल्याचे सांगत तातडीने डीजे यांना फोन करून बैठकीचे आयोजन केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व शिष्ट मंडळाची अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय पुरातत्व खात्याचे डीजे व इतर अधिकारी यांच्या समवेत शास्त्री भवन येथे बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन यमाई देवीचा चाळीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला आहे. यामुळे यमाई देवी भक्तांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाळुंग पंचक्रोशीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या काळात यमाई देवी मातेचा आशीर्वाद व भक्तांचे सहकार्य राहणार आहे. अशाप्रकारे बातमी बारामती झटका वेब पोर्टलवर प्रसारित झालेली होती. याचाच प्रत्यय ग्रामदैवत यमाईदेवीने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देवीने कौल दिलेला आहे. भविष्यामधील उर्वरित कामे करण्याकरता यमाई देवीचा व देवीभक्तांचा आशीर्वाद निश्चित मिळेल अशी परिसरामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort