कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यात खाजगी दूध संघ मालकाच्या दुधाला विरजण बसण्याची शक्यता ?

दूध डॉक मालक व डेअरी चालक व्यस्त तर दूध व्यवसायिक व शेतकरी त्रस्त अशी दयनीय अवस्था पहावयास मिळत आहे.

माळशिरस (बारामती झटका)

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव, सर्वसामान्य व गोरगरीब जनता दुग्ध व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतात. माळशिरस तालुक्यात खाजगी दूध संघाला दूध दिले जाते. खाजगी दूध संघाच्या चढाओढीत दूध दराचे आमिष डाॅक मालक व डेअरी चालक यांना दाखवून खाजगी दूध संघाचे मालक जास्तीत जास्त दूध आपल्या संघाला घेत असतात. दुधाचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण बदलले की दूध व दुधापासून तयार केलेली दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थ यांच्यावर परिणाम होतो. याचा परिणाम खाजगी दूध संघाच्या मालकांचे गणित बिघडते. चालू व्यवसायाला खीळ बसण्याची शक्यता असते. सध्या तशी परिस्थिती निर्माण झालेली असून दूध डाॅक मालक व डेअरी चालक दूध संघाच्या मालकाकडे लटकलेले पैसे काढण्याच्या धावपळीत व्यस्त आहेत. तर गोरगरीब व सर्वसामान्य जनता दूध व्यवसायिक शेतकरी बांधव दुधाचे पैसे मिळावेत यासाठी त्रस्त आहेत, अशी दुधाच्या व्यवसायाची दयनीय अवस्था पाहावयास मिळत असल्याने खाजगी दूध संघ मालकाच्या दुधाला पुन्हा विरजण बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीला पूरक व्यवसाय व गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या प्रपंचाला आर्थिक हातभार लागत असल्याने भूमिहीन जनता सुद्धा दुग्ध व्यवसाय करीत आहे. अनेक दुग्ध व्यवसायिक यांना स्वतःची जमीन नाही तरीसुद्धा दुसऱ्याच्या शेतातील कडवळ, मका, ऊस विकत घेऊन मुरघास तयार करून दुग्ध व्यवसाय करीत असतात. अशा छोट्या-मोठ्या दुग्ध व्यवसायिकांच्या कठीण आर्थिक परिस्थितीतून केलेल्या दुग्ध व्यवसायाला जर असा दूध डेअरी चालक, डाॅक मालक दूध संघ मालक यांच्याकडून दुधाचे पैसे रखडले तर गरीबाच्या प्रपंचाचे गणितच बिघडून जाते. दुसऱ्याच्या शेतातून घेतलेले खाद्य व दुकानातून आणलेली पेंड भरडा याचे पैसे द्यावेच लागतात‌. घरातील महिला भगिनी पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत गुरांचे शेणघाण, वैरण पाणी सर्व करीत असतात. आपल्या फाटक्या प्रपंचाला आधार असावा मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जवळचे काही कार्यक्रम असेल तरच घराबाहेर पडतात अन्यथा माहेरी सुद्धा जाण्याचे टाळत असतात. अशा कठीण परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य व गोरगरिबांच्या दुग्ध व्यवसायाचे पैसे लटकले तर आर्थिक गणित बिघडते. अशी अवस्था गोरगरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांची असते.

दूध संघ मालक स्पर्धेत दुधाचे दर कमी जास्त करून जास्तीत जास्त दूध संकलित करण्याचे काम सुरू असते. अशावेळी एक दोन रुपया ज्यादा देणाऱ्या दूध संघ मालकाकडे दूध डॉक मालक व डेअरी चालक आपले दैनंदिन संकलित झालेले दूध देत असतात. पंधरवडा व महिन्याला पेमेंट घेतले जाते आणि गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी दुग्ध व्यवसायिक यांना दिले जाते. सध्या केंद्र व राज्य सरकारचे धोरण आणि दूध संघ मालकाचे नियोजन यामध्ये जर तफावत झाली तर निश्चितपणे दूध संघ चालक अडचणीत येत असतात. अशीच अवस्था सध्या सुरू असल्याचे दुग्ध व्यवसायिकांमधून बोलले जात आहे. छोटे छोटे व्यवसायिक यांचा उदरनिर्वाह दुध धंद्यावर असल्याने त्यांचे जीवनमान कोलमडते. यासाठी दूध संघ चालकांनी शासनाला किंवा इन्शुरन्स कंपनी किंवा मोठमोठ्या कंपन्यांना जरी फसवले तरी चालेल मात्र, गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी बांधव व दुग्ध व्यवसाय यांना मात्र फसवून चालणार नाही. लवकरच दुधाचे पैसे देण्याची व्यवस्था करावी असाही सूर निघत आहे.

आज होळीचा सण असताना दुधाचे पैसे रखडलेले असल्याने गोरगरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिमगा सुरू आहे. गुढीपाडवा तरी आनंदाने व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काही दूध डॉक मालक डेअरी चालक व दूध संघ यांचे व्यवहार सुरळीत आहेत मात्र, ज्यांचे आर्थिक व्यवहार लटकलेले आहेत अशा दूध डॉक मालक डेअरी चालक व दूध व्यवसाय यांनी कागदपत्रासह आमच्याशी संपर्क साधला तरी कोणत्या दूध संघ मालक डोक मालक डेअरी चालक यांच्याकडे किती रक्कम लटकलेली आहे, याची रक्कम व नावासह बातमी प्रसारित केली जाईल. जेणेकरून पुढचे तरी पैसे गुंतणार नाहीत त्यासाठी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort