शेतकरी तरुणाने उद्योग व्यवसायात प्रगती करून भारतात आलेल्या नवीन मॉडेल लँड क्रूजर L.C.300 गाडी घेण्याचा पहिला मान उद्योजक प्रीतमशेठ देवकाते पाटील यांनी पटकावला…

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री मात्र शेतकरी तरुणाने शेती व उद्योग व्यवसायात प्रगती करून माळशिरस शहराच्या वैभवात भर टाकली…
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कॅबिनेट मंत्री सुभाषबापू देशमुख, पालकमंत्री विजयमालक देशमुख यांच्यासह अनेक खासदार आमदार झाले, कारखान्याचे चेअरमन झाले मात्र, शेतकरी तरुणाने शेती व उद्योग व्यवसायात प्रगती करून माळशिरस शहराच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर टाकलेली आहे. माळशिरस शहरातील युवा उद्योजक प्रीतमशेठ काशिनाथ देवकाते पाटील या शेतकरी तरुणाने उद्योग व्यवसायात प्रगती करून भारतात आलेल्या नवीन मॉडेल लँड क्रूजर एलसी 300 गाडी घेण्याचा पहिला मान पटकावलेला आहे.
युवा उद्योजक प्रीतमशेठ देवकाते पाटील यांनी माळशिरस शहरात शेतीच्या माध्यमातून आपली प्रगती केलेली आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पुणे, मुंबई सारख्या शहरात उद्योग व्यवसाय करून आपली प्रगती केलेली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शरयू मोटर्स, बारामती येथून भारतात आलेल्या नवीन मॉडेलची लँड क्रुजर L C 300 गाडी खरेदी केलेली आहे. विशेष म्हणजे शेतकरी तरुणाने शेती व उद्योग व्यवसायातून आपली प्रगती करून बँकेमध्ये स्वतःची पत निर्माण केली. फायनान्स मधून गाडी न घेता बँकेच्या माध्यमातून घेतलेली आहे.

तालुक्यात व जिल्ह्यात अनेक नेते व उद्योजक लोकांनी फायनान्सच्या गाड्या घेऊन तीन महिन्यांनी नंबर प्लेट काढून फिरवत असलेली पाहिले आहे.
माळशिरस तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे. या मार्गावरून पुण्याच्या दिशेने देहू-आळंदी-शिंगणापूर व पंढरपूरच्या दिशेने पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट अशा तीर्थक्षेत्रांसाठी रस्त्यावरून लँड क्रूजर गाड्या यापूर्वीच्या मॉडेल मधून गेल्या आल्या असतील. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांची लँड क्रूजर L.C.100 माढा मतदारसंघात फिरत असताना माळशिरस मतदारसंघात फिरलेली तालुक्यातील जनतेने पाहिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, अनेक खासदार, आमदार होऊन गेले, कारखान्याचे चेअरमन झाले. काहींनी कारखाने विकले तरीसुद्धा, एवढी मोठी महागाईची गाडी घेतलेली नाही मात्र, शेतकरी तरुणाने शेती व उद्योग व्यवसायात प्रगती करून तीन कोटी रुपयाची गाडी खरेदी करून माळशिरस शहराच्या व सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर टाकलेली आहे.
युवा उद्योजक प्रीतमशेठ देवकाते पाटील यांच्या गुढीपाडव्याच्या नवीन गाडी खरेदीची चर्चा महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सुरू आहे. सदरची गाडी माळशिरस शहराचे ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे पूजन करण्यासाठी आणलेली होती. सदरच्या गाडीचे पूजन बारामती झटका यूट्यूब चॅनल वरून थेट प्रक्षेपण केलेले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील, माळशिरस तालुक्यातील शेतकरी तरुणाने उद्योग व्यवसायात प्रगती करून तीन कोटीची गाडी खरेदी केली असल्याची चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.