नातेपुते येथील सेवानिवृत्त सॅनिटरी इन्स्पेक्टर तानाजीराव काळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन..

भूमाता ॲग्रो चे सर्वेसर्वा सुशील काळे व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुधीर काळे यांना पितृषोक…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते, ता. माळशिरस येथील सेवानिवृत्त वैद्यकीय सहाय्यक तथा सॅनिटरी इन्स्पेक्टर तानाजीराव जिजाबा काळे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भूमाता ॲग्रो चे सर्वेसर्वा सुशीलकुमार काळे व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भाजपचे नेते सुधीरजी काळे यांचे ते पिताश्री होते. त्यांच्यावर नातेपुते दहिगाव रोडवरील राहत्या निवासस्थानाशेजारी, काळे मळा येथील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026रोजी सकाळी 7.00 वाजता होणार आहे.
स्व. तानाजीराव काळे यांनी वैद्यकीय सहाय्यक तथा सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून बीड, केज येथे दीर्घकाळ नोकरी केलेली आहे. माळशिरस तालुक्यातील मोरोची प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवानिवृत्त झालेले आहेत. चार दिवसांपासून महाशिवरात्र कधी आहे, असे आपल्या परिवारातील व्यक्तींना विचारत होते. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, या उक्तीप्रमाणे महाशिवरात्री दिवशी आपला देह ठेवून जीवन यात्रा संपवलेली आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने काळे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काळे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवू व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



